Marathi News> हेल्थ
Advertisement

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री नियमित करतात योगाभ्यास!

सेलिब्रेटींमध्येही योगाबद्दलचा उत्साह...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री नियमित करतात योगाभ्यास!

मुंबई : आज जागतिक योग दिनानिमित्त देशभरात हजारो नागरिक योगाभ्यासाठी एकत्र आले आहेत. देशभरात योगाबद्दलचा उत्साह दिसत आहे. यात सगळ्यात आपल्या बॉलिवूड अभिनेत्रीही कुठे कमी नाहीत. योगाभ्यासाचे महत्त्व जाणून या अभिनेत्री फिटनेससाठी योगसाधना करतात. पाहुया कोणत्या आहेत त्या अभिनेत्री...

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचे रहस्यात योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. तिच्या योगाचे फोटोज आणि व्हिडिओज अनेकांचे लक्ष वेधून घेतात. काही दिवसांपूर्वी शिर्षासन करुन सर्वांना चकीत केले. गेल्या १५ वर्षांपासून ती नियमित योगसाधना करत आहे. 

fallbacks

मलायका अरोरा

मलायका अरोरा फिटनेस फ्रिक असल्याचे आपण सर्वच जाणतो. मलायका जटिल योगाने स्वतःला फिट ठेवते.

fallbacks

 

करिना कपूर खान

करिनाने प्रेग्नेंसीनंतर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी योगाची मदत घेतली. 

जॅकलिन फर्नांडीस

जॅकलिनचे योगाप्रेम तर सर्वश्रूत आहे. ती पोलवर देखील योगासने करत जबरदस्त तोल सांभाळते.

fallbacks

आलिया भट्ट

आलिया सुट्ट्यांवर गेल्यावरही वर्कआऊच करणे टाळत नाही. मालदीवला ट्रिपला गेल्यावर तिने अॅँटी ग्रेविटी, एलिअल योगा केला होता.

Read More