Marathi News> हेल्थ
Advertisement

दात घासण्यापूर्वी की नंतर? नाश्ता करण्याची 'हीच' योग्य वेळ; आतापर्यंत तुम्हीपण करायचात ही चूक?

Breakfast Timing: आधी ब्रश करावे की नाश्ता करावा? त्यामागे काय कारण आहे? सविस्तर जाणून घेऊया. 

दात घासण्यापूर्वी की नंतर? नाश्ता करण्याची 'हीच' योग्य वेळ; आतापर्यंत तुम्हीपण करायचात ही चूक?

Breakfast Timing: सकाळी उठल्याबरोबर काहीजण सर्वातआधी दात घासतात आणि नंतर नाश्ता करतात तर काहीजण प्रथम नाश्ता करतात आणि नंतर दात घासतात. पण यातला योग्य पर्याय कोणता? हे अनेकांना माहिती नसते. कारण चुकीच्या पद्धतीमुळे तुमचे दात खराब होऊ शकतात. सकाळी उठल्याबरोबर ब्रश करणे महत्वाचे असते कारण तोंडाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर होतात, असा दावा काहीजण करतात. तर काही लोक आधी नाश्ता करतात आणि नंतर दात घासतात जेणेकरून त्यांच्या दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण व्यवस्थित स्वच्छ होतील, असे त्यांना वाटते. आधी ब्रश करावे की नाश्ता करावा? त्यामागे काय कारण आहे? सविस्तर जाणून घेऊया. 

तोंडात बॅक्टेरिया

रात्रभर झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपले तोंड बॅक्टेरियांचे घर बनलेले असते. यामुळे तोंडात एक विचित्र चव आणि दुर्गंधी जाणवते. कारण रात्री लाळेचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे बॅक्टेरिया अधिक वाढू लागतात. अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया नाश्त्यापूर्वी काढून टाकावेत की नंतर? असा प्रश्न उभा राहतो.

प्रथम ब्रश करण्याचे फायदे

सकाळी उठल्याबरोबर दात घासल्याने तोंडात साचलेले बॅक्टेरिया आणि घाण साफ होते. सुरुवातीला ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्याने आम्लता कमी होते आणि तोंडाचे पीएच संतुलन राखले जाते.

लवकर नाश्ता करण्याचे फायदे आणि तोटे काय?

दात घासण्यापूर्वी नाश्ता केल्याने जेवणाची चव वेगळीच जाणवू शकते. नाश्त्यानंतर दात घासल्याने दातांमध्ये अडकलेले अन्न पूर्णपणे स्वच्छ होते. पण त्याचे तोटे देखील असू शकतात. नाश्त्यानंतर लगेच ब्रश केल्याने तुमच्या दातांचा बाह्य थर कमकुवत होऊ शकतो.  रात्रभर तोंडात साचलेले बॅक्टेरिया काढून टाकल्याशिवाय नाश्ता केल्याने ते पोटात जातात. ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

नाश्त्यापूर्वी दात घासावेत का?

नाश्त्यापूर्वी ब्रश केल्याने तुमचे तोंड ताजे राहील आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होईल. नाश्त्यानंतर लगेच ब्रश करणे टाळावे. जर तुम्हाला नाश्त्यानंतर ब्रश करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी 30 मिनिटांचा अंतर ठेवा, असा सल्ला डॉक्टर देतात. 


(Disclaimer -  प्रिय वाचक, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे.  'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही. आरोग्याशी संबंधित माहिती  स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)

Read More