Marathi News> हेल्थ
Advertisement

कसे असतात ते २२ दिवस; जाणून घ्या प्रवास कोरोनाची लढाई जिंकण्याचा

काय आहे कोरोना लक्षणांची टाईमलाईन...

कसे असतात ते २२ दिवस; जाणून घ्या प्रवास कोरोनाची लढाई जिंकण्याचा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा इलाज काय आहे? यावर औषध प्रभावी ठरतं का? रुग्णाची ओळख कशी होते? तो पूर्ण बरा होतो का? तो किती दिवसांत ठिक होतो? हे सगळे असे प्रश्न आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोनाची सुरुवात अगदी शांत होते. म्हणजे रुग्णाला याची ओळख तशी लवकर होत नाही. सुरुवातीला हा अगदी सामान्य तापाससारखा वाटतो. पण हळू-हळू रुग्णाला याची लागण होते. संशोधकांनी कोरोना व्हायरसबाबत एक टाईमलाईन तयार केली आहे. यात स्पष्टपणे असं सांगण्यात आलं आहे की, 22 दिवसांपर्यंत जो रुग्ण कोरोनाशी लढतो, तो पूर्णपणे बरा होता.

चीनपासून सुरु झालेला हा व्हायरस जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये पसरलाय. मेडिकल सायन्समध्ये सतत या व्हायरसवरील औषधं शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका, यूरोपसारख्या देशांत याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. पण अद्याप यावर ठोस उपाय किंवा इलाज सापडलेला नाही. 

काय आहे कोरोना लक्षणांची टाईमलाईन -

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांला तापाची लक्षणं पूर्णपणे दिसतात. पण हे संपूर्ण चक्र 22 दिवसांचं आहे. या 22 दिवसांपर्यंत रुग्णाने यावर मात केली, तर तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो. 

पहिला दिवस -

हलका ताप, थकवा, स्नायूंमध्ये वेदना, सूका खोकला

दुसरा दिवस -

श्वास घेण्यास त्रास

सातवा दिवस -

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल

आठवा दिवस -

तीव्र श्वसन त्रास

दहावा दिवस -

आयसीयूत दाखल, वेंटिलेटवरद्वारे देखरेख

12वा दिवस -

ताप कमी होण्यास मदत

13वा दिवस -

श्वास घेण्यातील अडचणी काही प्रमाणात कमी

18.5 दिवस -

अधिक गंभीर स्थिती असल्यास रुग्णांचा मृत्यू

22वा दिवस -

आजार बरा होतो, रुग्ण पूर्णपणे बरा होतो

योग्य ती काळजी घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. मात्र कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन, चाचणी, योग्य उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. घराबाहेर न पडणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं हा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा सर्वात सोपा, आणि उत्तम उपाय आहे.  कोरोनामुळे जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाक 60 हजारांवर पोहचली आहे. त्यापैकी 42 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. 

Read More