Marathi News> हेल्थ
Advertisement

कुरळ्या केसांना सरळ करताय तर थांबा, कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधातून उघड!

जर तुम्हीही केस स्ट्रेट म्हणजेच सरळ करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पहिल्यांदा वाचा.

कुरळ्या केसांना सरळ करताय तर थांबा, कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधातून उघड!

मुंबई : तुमचे केस कुरळे आहेत का? कुरळ्या केसांनी कंटाळून तुम्हीही हेअर स्ट्रेटनिंगचा विचार करताय का? तर थांबा...कारण नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, केस सरळ करण्यासाठी म्हणजेच हेअर स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे जर तुम्हीही केस स्ट्रेट म्हणजेच सरळ करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पहिल्यांदा वाचा.

अमेरिकेमध्ये दुर्मिळ आणि धोकादायक गर्भाशयाच्या कॅन्सरची प्रकरणं वाढताना दिसतायत. ज्याठिकाणी 15 वर्षांपूर्वी 39 हजार केसेस होत्या, आता हा आकडा 66 हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये कृष्णवर्णीय रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलंय. 

जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ज्या महिला नियमितपणे केमिकल हेअर स्ट्रेटनर वापरतात त्यांना या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.

संशोधकांच्या मते, ज्या लोकांनी केस स्ट्रेटनिंग प्रोडक्ट कधीच वापरलं नव्हतं त्यांना वयाच्या 70 व्या वर्षी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका 1.64% होता. अशातच ज्या व्यक्तींनी अशी उत्पादनं वापरणं सुरू ठेवलं त्यांच्यामध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका 4.05% होता. केसांना रंग देणाऱ्या रंगाचा कॅन्सरशी संबंध नव्हता.

हेयर स्ट्रेटनिंगमध्ये वापरले जातात हे केमिकल्स

नॅशनल कॅन्सर इंस्टिट्युटच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षी हेयर स्ट्रेटनरचा वापर केलेल्या महिला या कृष्णवर्णीय होत्या. 

एकंदरीत पाहिलं तर अभ्यासात असं दिसून आलं आहे की, हे स्ट्रेटनर स्त्रियांमध्ये हार्मोनशी संबंधित कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. या अभ्यासात, संशोधकांनी महिलांनी वापरल्या जाणार्‍या ब्रँड्सची किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या घटकांची माहिती गोळा केली नाही. मात्र हे संशोधन असं सूचित करतं की, पॅराबेन्स, बीपीए (बिस्फेनॉल-ए), धातू, फॉर्मल्डिहाइड यासारख्या स्ट्रेटनरमध्ये आढळणारी अनेक केमिकल्स गर्भाशयाच्या कॅन्सरच्या वाढीव जोखमीमध्ये योगदान देऊ शकतात.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More