Marathi News> हेल्थ
Advertisement

सार्वजनीक ठिकाणी तुम्हाला ओठ चावण्याची सवय आहे? मग ही वाईट सवय आत्ताच सोडा

व्यक्ती घाबरला, त्याला टेन्शन आलं तरी देखील ते आपलं ओठ चावतात. हे सामान्य वाटत असलं तरी ते सामान्य नाही.

सार्वजनीक ठिकाणी तुम्हाला ओठ चावण्याची सवय आहे? मग ही वाईट सवय आत्ताच सोडा

मुंबई : बऱ्याच लोकांच्या या समस्या आहेत की, ते काही विचार करु लागले की, ते आपले ओठ चावतात. तसेच व्यक्ती घाबरला, त्याला टेन्शन आलं तरी देखील ते आपलं ओठ चावतात. हे सामान्य वाटत असलं तरी ते सामान्य नाही. यामुळे तुमचे ओठ काळे आणि कुरूप होऊ लागतात. परंतु हे असं का होतं असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही उपाय सांगणार आहोत.

ओठ का चावतात?

असे मानले जाते की कधीकधी आपण काळजीत असताना देखील आपले ओठ चावतो. तर काही लोकांसाठी ओठ चघळण्याची सवय लागते, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही ही सवय सोडली नाही तर तुमच्या ओठांवर वेदनादायक फोडही येऊ शकतात. ओठ चावण्याची सवय सोडणे फार कठीण आहे. कारण हे वागणं इतकं नैसर्गिक होऊन जातं की तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते. परंतु ही सवय मोडण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत.

या कारणांमुळे देखील तुम्ही तुमचे ओठही चावू शकता

असे मानले जाते की काही प्रकरणांमध्ये, शारीरिक परिस्थितीमुळे, व्यक्ती ओठ चावू लागते. तर इतर अनेक बाबतीत मानसिक कारण देखील असू शकतात. तणाव, भीती किंवा चिंता यासारख्या भावनिक अवस्थेला शारीरिक प्रतिसाद म्हणून तुम्ही तुमचे ओठ चावता असे मानले जाते.

सवय सुटण्यासाठी हे काम करा

जर तुम्ही सतत ओठांना मॉइश्चराइज करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येचा सामना कमी करावा लागेल. याशिवाय ओठ चावण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला कमी ताण घ्यावा लागेल. म्हणजे तुमच्यावर ओठ चावण्याची वेळच येणार नाही.  तणाव दूर करण्यासाठी तुम्ही योगाची मदत देखील घेऊ शकता. जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतः ही सवय लवकर सोडाल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)

Read More