Foamy Urine Causes and Symptoms : कुठल्याही आजाराचे पहिले संकेत आपल्याला लघवीचा रंग सांगतो. डॉक्टरदेखील यूरिन टेस्ट करुन आजार सांगतात. जर तुम्हाला लघवी करताना त्यात फेस किंवा बुडबुडे दिसत असेल तर हे सामान्य गोष्ट नाही. तुमच्या लघवीमध्ये फेस दिसल्यास हे मोठ्या आजाराचे लक्षण आहे. तुम्हाला वारंवार लघवीमध्ये फेस दिसत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जा.
- हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.
- थकवा
- भूक कमी लागणे
- मळमळ
- उलटी
- झोपेची समस्या
- लघवी कमी तयार होणे
- जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे
- जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे
लघवीमध्ये फेस येणे हे किडनीच्या जळजळीचे किंवा किडनीशी संबंधित समस्येचे मोठं लक्षण असतात. जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा लघवीमध्ये प्रथिने दिसतात, वैद्यकीय भाषेत त्याला प्रोटीन्युरिया म्हणतात.
लघवीमध्ये बुडबुडे येणे हे शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचे लक्षण असण्याची शक्यता आहे. कधीकधी लघवीमध्ये बुडबुडे येणे सामान्य असू शकतं. पण दररोज लघवीमध्ये फेस येणे सामान्य नसतं. जर बराच काळ लघवीमध्ये फेस येण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, ते मधुमेहाचे लक्षण असण्याची शक्यता आहे.
जर लघवीमध्ये बुडबुडे किंवा फेस बराच काळ दिसत असेल तर ते प्रोटीन्युरियाची समस्या असू शकते. या स्थितीत शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिने उत्सर्जित करण्यास सुरुवात करते. खरं तर, जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नाही तेव्हा प्रथिने मूत्रात जाऊ लागतात.
धण्याचं पाणी
धण्याचं पाणी सेवन केल्याने लघवीसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरु शकतं. लघवीतून फेस येणे किंवा जास्त वास येणे यावर तुम्ही मात करु शकता. या पाण्याच्या सेवनाने यूटीआयची समस्या दूर होण्यासदेखील फायदा मिळतो. धण्याचं पाणी तयार करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा धणे टाकून उकडून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर गाळून त्याचं सेवन करा. दिवसातून दोन वेळा या पाणी प्या.
आल्याचं पाणी
आल्याचं पाणी पिऊनही तुम्ही लघवीतील दुर्गंधी आणि फेस दूर करू शकता. यासाठी अर्धा तुकडा आले घ्या आणि एक कप पाण्यात ते उकडा. पाणी कोमट झाल्यावर चहासारखं थोडं थोडं सेवन करा.
ब्लूबेरी ज्यूस
लघवीमधून फेस किंवा दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ब्लूबेरीचा ज्यूस सेवन केला पाहिजे. यूटीआय इन्फेक्शन, लघवीतून वास, ब्लॅडरमधील इन्फेक्शन इत्यादी समस्या या ज्यूसने दूर होतात. एक कप ब्लूबेरी ज्यूस दिवसातून दोन वेळा सेवन करा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)