मुरुमांमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होऊ शकते आणि त्यामुळे अनेक लोक या समस्येवर उपाय शोधतात. महागडी औषधे, क्रिम्स आणि विविध उपचारांचा वापर करून ते या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय काही लोक घरगुती उपाय वापरण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एक पद्धत म्हणजे सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ चेहऱ्यावर लावणे.
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी देखील एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिला मुरुम येतात तेव्हा तीही तोंडातील लाळ वापरते. हे ऐकून अनेक लोक आश्चर्यचकित झालेत, परंतु हे करणे खरचं योग्य आहे का? पाहूयात तज्ज्ञ काय म्हणतात.
लाळेतील घटक आणि त्याचे फायदे
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या 2019 च्या अभ्यासानुसार, मानवी लाळेमध्ये काही घटक असतात, जे त्वचेवरील जखमा लवकर बऱ्या करण्यात मदत करतात. लाळेमध्ये हिस्टाटिन, म्यूकिन्स आणि कॅथेलिसिडिन सारखे सक्रिय पेप्टाइड्स असतात, ज्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लाळेमध्ये असलेले पोषक घटक आणि गुण त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात.
तज्ज्ञांचे मत:
गुरुग्राम येथील 9 म्यूज वेलनेस क्लिनिकमधील कॉस्मेटिक सर्जन डॉ. गीता ग्रेवाल यांचे म्हणणे आहे की, 'लाळेमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुमांसाठी फायदेशीर ठरू शकतात. याशिवाय लाळेचा pH देखील मुरुमांवर परिणाम करू शकतो. सर्वसाधारणपणे लाळ शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा भाग आहे. म्हणून लाळेचा वापर विशिष्ट वेळेस फायदेशीर ठरू शकतो.'
कोणत्या वेळेस लाळ लावणे उपयुक्त नाही?
लाळ लावण्याची पद्धत सर्वांसाठी उपयुक्त असू शकत नाही. डॉ. गीता ग्रेवाल यांचे म्हणणे आहे की, पीसीओडी, हार्मोनल असंतुलन किंवा इन्फेक्शनसारख्या समस्या असलेल्या व्यक्तींनी हे उपाय टाळावे. कारण अशा वेळेस लाळेमध्ये आधीच बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे मुरुमांची तीव्रता वाढू शकते. लाळ लावण्याऐवजी चेहरा स्वच्छ ठेवणे, संतुलित आहार घेणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
किती काळ लाळ लावणे योग्य आहे?
जेव्हा तोंडातील लाळ चेहऱ्यावर लावायची असते, तेव्हा ती स्वच्छ हाताने किंवा कपड्याने लावली पाहिजे. त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी, लाळ लावल्यानंतर काही वेळाने चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. तसेच हे लक्षात ठेवा की लाळेत काही प्रमाणात जंतूं असू शकतात, म्हणून त्याचे नियमित आणि सुरक्षित वापर अधिक महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा: झोप लागण्यास 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणं गंभीर आरोग्याचे संकेत, अजिबात करु नका दुर्लक्ष
चांगले आणि सुरक्षित उपाय:
1. चेहरा स्वच्छ ठेवा: चेहऱ्यावरील मुरुमांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी, तो स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
2. संतुलित आहार: मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताजे फळे, भाज्या आणि प्रथिने अधिक प्रमाणात खा.
3. भरपूर पाणी प्या: शरीर हायड्रेटेड ठेवल्याने त्वचेला पोषण देण्यास मदत करते.
4. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या: मुरुमे जर लवकर बरे होत नसतील तर त्वचारोगतज्ज्ञाची मदत घ्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)