Marathi News> हेल्थ
Advertisement

पायांच्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका! एक महिन्यापूर्वीच दिसतात हार्ट अटॅक येणाचे लक्षणं

Signs of Heart Attack : गेल्या काही वर्षांमध्ये हृदय विकाराच्या झटक्यामुळे अनेकांचा प्राण गेला आहे. कमी वयातही हार्ट अटॅकचा धोका वाढलेला दिसत आहे. अशात पायामध्ये काही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. शिवाय हृदय विकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी त्याची लक्षणं दिसतात.

पायांच्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका! एक महिन्यापूर्वीच दिसतात हार्ट अटॅक येणाचे लक्षणं

Signs of Heart Attack : गेल्या काही काळामध्ये बदलेल्या जीवनशैलीमुळे मानवाच्या आरोग्यावर त्याचा खोलवर परिणाम पाहिला मिळतोय. कामाचा वाढता ताण, कामाचा वेळा, अवेळी खाणे आणि त्यात अनहेल्दी, जंक फूडवर भर यामुळे तरुण पिढीला कमी वयात अनेक आजारांनी ग्रासलंय. मानसिक स्वास्थ बिघण्यापासून अनेक गंभीर आजार तरुण पिढीमध्ये दिसून येत आहे. याचा परिणाम तरुणपणातच हार्टअटॅकच्या प्रमाण वाढले आहेत. हार्ट अटॅकमुळे मृत्यूच्या संख्येतही गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ पाहिला मिळतंय. एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच आपलं शरीर संकेत देत असतात. शिवाय पायांमध्ये काही लक्षणं दिसतात त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.  (Signs of Heart Attack)

तज्ज्ञ सांगतात की, सायलेंट हृदयविकाराचा झटका हा अतिशय धोकादायक मानला जातो. हा हृदय विकाराचा झटका ओळखणे फारच कठीण असतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्या हल्ल्याच्या लक्षणांकडे त्यांचं कळत न कळत दुर्लक्ष होतं. तज्ज्ञ सांगतात की, हृदय विकाराचा झटका येणार असेल तर तुम्हाला एक महिन्यापूर्वीपासूनच लक्षणं दिसतात. पण सामान्य लश्रणं म्हणजे छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागतो. तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच शरीरात दिसून येतात. ही लक्षणे कोणती आहेत? हार्ट अटॅक आल्यावर कोणतीा काळजी घेतली पाहिजे? पाहूयात. 

जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीपासूनच दिसायला लागतो. या संशोधनात 500 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता, त्यात 95 टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या महिन्याभरापूर्वी शरीरात काही बदल दिसून आले होते. हे बदल हार्ट अटॅकची लक्षणे असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 71 टक्के महिलांना जास्त थकवा आला होता. तर 48 टक्के महिलांना झोपेशी निगडीत समस्या जाणवत होती. तर अन्य महिलांना छाती दुखणं, छातीवर दाब येणे, वेदना ही लक्षणं दिसून आलीत. 

एक महिन्या आधीच...

थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हे तुम्हाला साधारण एक महिन्यापूर्वीपासून ही लक्षणं दिसू लागतात. तुम्हाला ही लक्षणं जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

पायांच्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

'डेली मेल’च्या बातमीत तज्ज्ञ सांगतात, की हृदयरोगाची पहिली लक्षणं आपल्या शरीरात सर्वात आधी पायांमध्ये दिसतात. खरं तर, जेव्हा रक्ताच्या नसांमध्ये चिकट कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं, तेव्हा रस्ता अरुंद होतो, त्यामुळे शरीराच्या दूरच्या भागांमध्ये कमी रक्त पोहोचतं. त्यामुळे पायांमध्ये त्याची लक्षणं दिसायला लागतात.

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्राॅल जमा झाल्यामुळे होणारे त्रास

जेव्हा हृदयाकडून पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका खूप वाढतो. घोट्यांपर्यंत पोहोचताना रक्तवाहिन्या आधीच खूप बारीक होतात, त्यामुळे तिथे रक्त पोहोचायला आधीच त्रास होतो. आणि जेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात, तेव्हा आणखी जास्त त्रास होतो. पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की तिथे थंड वाटतं, पाय सुन्न होतात. काही वेळा पायांमध्ये दुखतं आणि सूजही येते. पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की त्याचा परिणाम नखांवरही होतो. त्यामुळे नखं कमजोर आणि ठिसूळ व्हायला लागतात.

काय करायला हवं?

डॉक्टर सांगतात, की आपण नेहमी आपल्या पायांची काळजी घेतली पाहिजे. अगदी नखांचीसुद्धा. कारण पायांच्या आरोग्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याची गोष्ट सांगतो. अनेक प्रकारच्या रोगांची लक्षणं सर्वात आधी पायांमध्ये दिसतात. संशोधनानुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चारपैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयविकाराचा सामना करावा लागतो. वेळेवर पायांकडे लक्ष दिलं, तर हृदयविकाराच्या गुंतागुंती आधीच कमी करता येऊ शकतात.

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा व्हायला लागली, तर त्याला पेरिफेरल आर्टरी डिसीज (peripheral artery disease) म्हणतात. त्याची लक्षणंही पायांमध्ये दिसतात. यामध्ये, पायांमध्ये वारंवार दुखतं आणि चालताना खूप त्रास होतो. मात्र, हे दुखणं थोड्या वेळानंतर गायब होतं, त्यामुळे लोक सहसा लक्ष देत नाहीत. यामध्ये, दोन्ही पायांमध्ये एकाच वेळी दुखतं. पायांमध्ये मुंग्या येणं, दुखणं, जळजळणं, त्वचा कोरडी होणं, त्वचा फाटायला लागणं, फोड येणं, जखमा होणं, हे सगळं हलक्यात घेऊ नये. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

Read More