Marathi News> हेल्थ
Advertisement

आता थेट चहाच कमी करेल तुमचं Belly Fat; कसं जाणून घ्या!

स्थितीत शरीराचे वजन संतुलित राहण्यासाठी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

आता थेट चहाच कमी करेल तुमचं Belly Fat; कसं जाणून घ्या!

मुंबई : शरीराच्या वाढत्या वजनामुळे आजकाल अनेकजण त्रस्त आहेत. कारण शरीराचे वजन जास्त असल्यास हृदय, रक्तातील साखर, ब्रेन स्ट्रोक इत्यादी आजारांचा धोका वाढवतं. अशा स्थितीत शरीराचे वजन संतुलित राहण्यासाठी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. याशिवाय शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करू शकता.

तुम्हाला माहितीये अननसाच्या चहाने तुम्ही वजन कमी करू शकता. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा एक चहा आहे जो केवळ वजन कमी करत नाही तर चिंता, अस्वस्थता, त्वचेच्या समस्या इत्यादींवर देखील फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया हा चहा कसा बनवायचा.

अननसाचा चहा कसा बनवायचा

हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 2 ते 2 चिरलेलं अननस, छोटा चमचा आलं, 1 टीस्पून हळद, दोन चिमूटभर जिरेपूड, 1 टेबलस्पून चहाची पानं आणि 1 लिटर उकळलेलं पाणी लागणार आहे. आता तुम्हाला ग्रीन टी बनवणार आहे. 

एक भांडे घ्या आणि त्यात अननस, आलं, हळद आणि जिरं मिसळा. आता तुम्हाला त्यात उकळलेल्या पाण्यात हिरवी पानं मिसळायची आहेत.

हे मिश्रण आता रोज प्या. यामुळे हळूहळू शरीरातील चरबी कमी होऊ लागते. हा चहा तुम्ही रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या काही वेळापूर्वी पिऊ शकता. डायबेटीजच्या लोकांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही हे खूप फायदेशीर मानला जातो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More