Marathi News> हेल्थ
Advertisement

व्यायाम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तुम्ही घेत असलेलं प्रोटीनशेक नकली?

हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं, त्यासाठी अनेक जण जिमला जातात, जिमबरोबरच प्रोटीनही महत्त्वाचं असतात... पण तुम्ही घेत असलेलं प्रोटीन बनावट आहे की नाही याची खात्री करा

व्यायाम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तुम्ही घेत असलेलं प्रोटीनशेक नकली?

Bogus Protein Racket : हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं. आपण हेल्थी असावं, असं कुणाला वाटत नाही? त्यासाठी काहीजण एक्सरसाईज (Exercise) करतात. काहीजण जिमला (Gym) जातात. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करत घाम गाळतात. अर्थातच एवढी मेहनत केल्यानंतर पोषक खाणंही गरजेचं आहे.. त्यासाठी बाजारात डायट प्रोटीन सप्लिमेंट्स (Diet Protein Supplements) उपलब्ध आहेत. मात्र याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नकली प्रोटीनशेक, आरोग्याशी खेळ 
बाजारातील 15% प्रोटीन पावडरची (Protein Powder) क्वालिटी चांगली नसल्याचं समोर आलं आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI च्या सर्व्हेमध्ये ही बाब स्पष्ट झाली.  यासाठी 1 लाख 45 हजार प्रोटीन पावडरच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4900 नमुने आरोग्याला घातक असल्याचं आढळलं. 16 हजार नमुन्यांची क्वालिटी फारच खराब होती. तर साडे 16 हजार नमुन्यांच्या लेबलवर प्रॉडक्टबाबत चुकीची माहिती देण्यात आली होती. FSSAI या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन 5 हजाराहून अधिक फौजदारी, तर तब्बल 29 हजार दिवाणी गुन्हे दाखल केले. 53 कोटीहून अधिक रकमेची दंड वसुली केली. मात्र तरीही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा गोरखधंदा थांबलेला नाही. 

नकली प्रोटीनशेक, आरोग्याशी खेळ 

fallbacks



fallbacks

मात्र थोडीशी सावधगिरी बाळगली तर चांगली आणि वाईट प्रोटीन पावडर ओळखणं सहज शक्य आहे.

कशी ओळखाल नकली प्रोटीन पावडर? 
fallbacks

fallbacks

तंदुरुस्त राहायला हवं, हे खरंच... पण त्यासाठी आपल्याच आरोग्याशी खेळ तर होत नाही ना, याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी...

Read More