Marathi News> हेल्थ
Advertisement

दही, दूध फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतंय, हे नक्की वाचा....

दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा.... 

दही, दूध फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतंय, हे नक्की वाचा....

मुंबई : खाद्यपदार्थ कोणताही असो, तो फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. विशेष म्हणजे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिथं तापमान हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. 

खाद्यपदार्थ साठवण्यासाठी फ्रिजची फार मदत होते. पण, दूध फ्रिजमध्ये ठेवताना आत असणाऱ्या तापमानाची माहिती असणं फायद्याचं ठरतं. 

अनेकदा दूध वेगवेगळ्या ठिकाणी फ्रिजमध्ये ठेवल्यासही ते खराब होतं. इथं तापमनानात झालेला चढऊतार कारणीभूत ठरतो. 

फ्रिजमध्ये जर फ्रिजर खालच्या भागात असेल तर तिथेच दूध आणि दह्यासारखे पदार्थ ठेवावेत. अन्यथा फ्रिजर वरच्या बाजूला असल्याच तिथेच हे पदार्थ ठेवावेत. 

सहसा मधल्या भागामध्ये दूध ठेवू नये, असं केल्यास दूध फाटण्याची दाट शक्यता असते.

अशा पदार्थांमध्ये बाष्प जमणार नाही, याची विशेष काळजी घ्या. सतत दूध फ्रिजमधून बाहेर काढून ते पुन्हापुन्हा आतबाहेर केल्यानं ते डचमळतं आणि तापमानाच होणाऱ्या फरकांमुळे दूध खराब होतं. 

दूध, दही फ्रिजमध्ये कायम मागच्याच भागात ठेवावं. तुम्ही जर हे पदार्थ पुढे ठेवत असाल तर ही सवय आताच मोडा. 

कारण, पुढच्या भागात अनेकदा गरम हवा तयार होते. असं झाल्यास दुधामध्ये बाष्प तयार होऊन ते खराब होण्याची शक्यता असते. 

फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी लवकर खराब होतात? 
• केचप, मस्टर्ड, सोया सॉस, सॅलड
• स्पार्कलिंग  वॉटर 
• ड्रेसिंग, जॅम 

Read More