Marathi News> हेल्थ
Advertisement

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

मुंबई : पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. पावसाळा अनेक आजारांना निमंत्रण देते. वारंवार होणारी सर्दी, खोकला आणि ताप यामुळे अनेकजण हैराण असतात. पण तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्हाला या समस्यांवर मात करणे सोपे होते. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा. पाहुया रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात....

आवळा

सकाळी नाश्यात एक आवळा खा. व्हिटॉमिन सी युक्त आवळ्यामुळे तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

कोरफड ज्युस

यात अॅंटी ऑक्सिडेंट असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारांशी सामना करण्यास मदत होते. ३० मिली कोरफड ज्यूस १०० मिली पाण्यात मिसळून प्या.

अक्रोड

अक्रोडमुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढते. म्हणून पावसाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अक्रोड अवश्य खा.

अळशी

अळशीत ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.  त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी शरीर तयार होते. अळशी वाटून त्याची पावडर बनवा व दही किंवा सलाडवर घालून त्याचे सेवन करा.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घ्या.

Read More