Marathi News> हेल्थ
Advertisement

गणेशोत्सवासाठी आरोग्यदायी पौष्टिक मोदक

शरिराला फायदेशीर 

गणेशोत्सवासाठी आरोग्यदायी पौष्टिक मोदक

मुंबई : गणपतीचा आवडता प्रसाद मोदक. खरंतर मोदक आवडत नाही असं म्हणणारी व्यक्ती विरळाच. गुळ-खोबऱ्याचं सारण असलेला उकडीचा मोदक म्हणजे क्या बात. संकष्टी-अंगारकीला मराठी घरातून हक्काने तयार होणारा असा हा पदार्थ. अलिकडे या पदार्थावर अनेक प्रयोग होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चॉकलेटचे मोदक. साधारणपणे मिठाईच्या दुकानात मिळतात ते माव्याचे मोदक असतात. यांत अजून एक मोदक आपलं स्थान निर्माण करू पाहत आहे तो म्हणजे जस्ट इट फूड्सचे हेल्दी मोदक. 

हेल्दी मोदक म्हणजे मावा, स्टार्च, साखर, आरारूट, कृत्रिम रंग या सारख्या आरोग्यास अपायकारक असणाऱ्या घटकांचा वापर न करता तयार करता येणारा मोदक. डॉ. विद्या क्षीरसागर यांनी आरोग्याच्या दृष्टीने सखोल संशोधन करून हे हेल्दी मोदक तयार केले आहेत. गहू, हिरवे मूग, गूळ, तीळ, शुद्ध गायीचं तूप यांपासून हे मोदक तयार केले जातात. वेलची आणि जायफळाच्या स्वादात हे मोदक उपलब्ध आहेत. या मोदकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ३० दिवसापेक्षा जास्त हे मोदक टिकतात.  त्यामुळे घरी प्रसाद म्हणून देण्यासाठी आणि बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत.

 अलिकडे माव्याची मिठाई खाऊन लोकांना विषबाधा झाल्याचे सर्रास वाचावयास मिळते. तसेच स्टार्च, साखर, आरारूट सारखे घटक शरीराला अपायकारक आहेत. त्यामुळेच हे घटक जरासुद्धा या मोदकामध्ये वापरले जात नाहीत. डॉ. विद्या क्षीरसागर सकस फुड्सच्या ‘जस्ट इट’ ब्रॅण्ड अंतर्गत मोदक निर्मिती करतात. या व्यतिरिक्त हेल्दी स्नॅक्स, एनर्जी बार जे आरोग्यास हितकारक असतात त्याची देखील निर्मिती करतात. ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना रोजगार देण्यासाठी सकस फुड्सचा प्रयत्न चालू आहे. निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात हे मोदक पोहोचले आहेत. अगदी घरबसल्या देखील ऑनलाईन हे मोदक उपलब्ध आहेत. घरपोच मोदक मिळविण्यासाठी www.justeatfoods.com संकेतस्थळावर भेट द्या. तेव्हा यंदाचा गणेशोत्सव हेल्दी साजरा करण्यासाठी जस्ट इटचे हेल्दी मोदक जोडीला असलेच पाहिजे.

Read More