Marathi News> हेल्थ
Advertisement

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. 

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

मुंबई : आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. 

उंटाच्या दुधाचा सर्वाधिक मोठा फायदा म्हणजे मंद बुद्धीच्या मुलांना यांच्यावर चांगला परिणाम होतो. बिकानेर यांचे राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्राने उंटाच्या दुधाने बनवलेल्या दूधाचे प्रोडक्ट विकले आहेत. 

मेंदूचा विकास 

उंटाच्या दुधाचे दररोज सेवन केल्यामुळे मेंदूचा चांगला विकास होतो. लहान मुलांना आणि खास करून मंदबुद्धीच्या मुलांसाठी याचा अधिक फायदा होतो. उंटाचं दूध लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवतात. 

हाडांना मजबूत करतात 

उंटाच्या दुधात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. याचं सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होते. यामध्ये लेक्टोफेरिन नावाचे तत्व असते ते कॅन्सरला देखील दूर ठेवण्यास मदत करतात. तसेच या दुधामुळे रक्तातील टॉक्सिन्स देखील दूर ठेवतात. तसेच पोटाचे विकार देखील कमी होतात. 

डायबिटीजपासून आराम मिळतो 

उंटाचे दूध प्यायल्यास डायबिटीज सारखे रोग कमी होतात. उंटाचे दूध यावर रामबाण उपाय आहे. या दुधाच्या एका लीटरमध्ये 52 युनिट इन्सिलीन असते. इतर दुधापेक्षा यामध्ये इन्सुलीनचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शरिरातील प्रतिरोधक क्षमता देखील वाढते. 

स्किन प्रॉल्बेम होतो दूर 

इतर आजारांबरोबरच त्वचेचा आजार दूर करण्यासाठी या उंटाच्या दुधाचा सर्वाधिक फायदा होतो. उंटाच्या दुधात अल्फा हायड्रोक्सिल अम्ल पदार्थ असते. यामुळे त्वचा सर्वाधिक ग्लो होते. अनेक सौंदर्याशी संबंधित असलेल्या प्रोडक्टमध्ये उंटाचे दूध असते. 

Read More