Marathi News> हेल्थ
Advertisement

Laptop वर काम करुन दुखू लागलेत हात आणि बोटं; अशा प्रकारे द्या आराम

Laptop Using Tips : लॅपटॉपवर काम करता करता आपल्याला जाणवते की आपले हात आणि बोटं दुखू लागतात, अशातच आपल्या हातांना आणि बोटांना आराम देण्याच्या कोणत्या पद्धती आहेत ते जाणून घेऊयात. 

 Laptop वर काम करुन दुखू लागलेत हात आणि बोटं; अशा प्रकारे द्या आराम


How to Relax Hands and Fingers  : भारतामधील अधीकतर लोकसंख्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काम करते, तो आपल्या आयुष्याचा एक प्रमुख भाग बनला आहे, मग शाळा असो कॉलेज असो किंवा कोणतेही ऑफिस असो, या गॅजेट्सशिवाय आपलं काम होत नाही. किबोर्डवर जास्त वेळ काम केल्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी आणि मानदुखी सारख्या समस्यांनी आपण हवालदिल होतो. पण तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की आपले हात आणि बोटं दीर्घकाळ कामानंतर थकतात. जर तुम्हीसुद्धा दिर्घकाळ काम करुन थकला असाल तर तुमच्या हातांना आणि बोटांना या सोप्या पद्धती वापरुन आराम देऊ शकता. 

काय आहेत 'या' सोप्या पद्धती जाणून घेऊयात...

1. योग्य स्थिती आवश्यक...

लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काम करताना आपण कोणत्या स्थितीत बसलो आहोत यावरुन ठरते की, आपल्याला शारिरीक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे किंवा नाही. लॅपटॉपला अशा ठिकाणी ठेवा जिथून तुम्ही तो सहज वापरु शकता. जर तुम्हाला वाटत असेल की लॅपटॉपची स्क्रिन खूप जवळ आहे आणि टाइप करण्यात अडचण येत असेल तर कीबोर्ड आणि स्क्रीनला व्यवस्थित समायोजित करा. अशावेळी लॅपटॉपला आपण अतिरिक्त कीबोर्ड जोडू शकतो. 

2. जास्त जोरात टायपिंग करु नका...

काही लोकांना खूप जोरात टायपिंग करण्याची सवय असते, परंतु काही वेळा दिलेल्या वेळेत कामपुर्ण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. असं करणं आपल्याला टाळायला हवं, कारण कीबोर्डवर जोरात टायपिंग केल्यामुळे तुमच्या हातावर आणि बोटांवर ताण पडू शकतो. यापासून वाचण्यासाठी हलक्या हातांनी टायपिंग करणे योग्य ठरेल. 

3. आपले हात ताणा...

लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काम असताना थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरिराच्या भागांना आराम मिळतो. एखादे काम पूर्ण केल्यानंतर हात आणि बोटांना ताणुन घ्या, असं केलं नाही तर समस्या आणखीन गंभीर होऊ शकते. काम करताना, तुम्ही तुमची मुठ 2 ते 4 वेळा बंद आणि उघडली पाहिजे. याच्या व्यतिरीक्त बोटे आणि हातांना पूर्ण उघडून स्ट्रेच केल्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. 

Read More