Marathi News> हेल्थ
Advertisement

फुफ्फुसांचं नुकसान होण्यापासून वाचवतील हे 4 खाद्यपदार्थ!

फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे.

फुफ्फुसांचं नुकसान होण्यापासून वाचवतील हे 4 खाद्यपदार्थ!

मुंबई : चांगला हेल्दी डाएट घ्या असं डॉक्टर नेहमी आपल्याला सांगतात. योग्य आणि संतुलित आहार आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतो. याचा फायदा फुफ्फुसांना देखील होतो. फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट कंपाऊंड्स फुफ्फुसाचं कार्य सुधारण्यास मदत करतात. 

या पदार्थांचा आहारात करा समावेश

बेरीज

बेरीमध्ये Anthocyanins असतं. हे एक  Flavanoid आहे, Strawberry, Blue Berriesमध्ये असतं. फ्री रॅडिकल्समुळे फुफ्फुसांचे नुकसान होतं. बेरीजमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट कंपाऊंड्स फुफ्फुसाच्या कामामध्ये घट होण्याचा दर कमी करतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केल्याने आरोग्याला फायदा होतो. ते Carotenoidsचं प्रमाण भरपूर असतं. एका अभ्यासानुसार हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असंही समोर आलं होतं. त्यामुळे रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश करा. 

लाल रंगाची फळं आणि भाज्या

लाल रंगाच्या भाज्या आणि फळे खाणं देखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्यात लाइकोपीनचं प्रमाणात भरपूर असतं. हे एक अँटिऑक्सिडंट आहे, जे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

कॅफेन

कॅफेनचे दररोज सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण कॉफीमध्ये इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. हे फुफ्फुसाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. मात्र कॅफेनचं अतिप्रमाणातंही सेवन करू नये.

Read More