Marathi News> हेल्थ
Advertisement

बेपत्ता झालेला रोशन सोढी 'या' आजाराने ग्रस्त, आजारावर कशी कराल मात?

High BP Control Tips: तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणारे कलाकार गुरुचरण सिंह बेपत्ता आहेत. सोढींना एका आजाराने ग्रासलं होतं. या आजाराने तुम्ही कसा कराल बचाव? 

बेपत्ता झालेला रोशन सोढी 'या' आजाराने ग्रस्त, आजारावर कशी कराल मात?

High Blood Pressure Control Tips: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण बेपत्ता झाल्याच्या वृत्तानंतर टीव्ही जगतात खळबळ पसरली आहे. सोढीचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता त्याची मैत्रीण सोनी हिने गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती ठीक नसल्याचा खुलासा केला आहे. सोढी लवकरच परततील अशी आशा त्यांनी व्यक्त केली असून ते त्यांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहेत.

सोढी यांची प्रकृती नव्हती बरी 

सोनीने दिलेल्या माहितीनुसार, 'त्याचे पालक चिंतेत आहेत आणि त्यांनी दिल्लीत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मी मुंबईत तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण तो परतला नाही तर तक्रार करता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरणची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे मी काळजीत आहेत. 

हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय?

उच्च रक्तदाब, ज्याला हाय ब्लड प्रेशर देखील म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्त धमन्यांच्या भिंतींवर सतत उच्च दाब असल्यामुळे, हृदयाला रक्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते. या समस्येमुळे हृदय शरीरात योग्य प्रकारे रक्त पंप करत नाही. ही एक गंभीर समस्या आहे, ज्यावर वेळीच नियंत्रण न केल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे

छातीत दुखणे हे उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्हाला वारंवार छातीत दुखत असेल तर ते उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचे लक्षण असू शकते.

रक्तदाब वाढल्यामुळे सतत डोकेदुखी असते. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात, परंतु उच्च रक्तदाब हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते.

चेहऱ्यावर तूप लावणे योग्य आहे का, जाणून घ्या तुपाच्या वापरामुळे त्वचेच्या काळजीवर काय परिणाम होऊ शकतात.

उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास जाणवणे देखील समाविष्ट आहे. श्वास घेताना वारंवार श्वास लागणे आणि छातीत दुखणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

उच्च रक्तदाबामुळे दिसण्यात अडचण येते. ज्या पुरुषांना दृष्टी अंधुक होऊ लागली आहे किंवा त्यांना दृष्टीच्या समस्या आहेत त्यांनी उच्च रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी.

उच्च रक्तदाबामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. जेव्हा रक्तदाब जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा नाकातून रक्तस्त्राव अधिक सामान्य होतो. अशा स्थितीत रक्तदाब तपासणे आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Read More