Marathi News> हेल्थ
Advertisement

चोंदलेले नाक मोकळं करण्यास फायदेशीर 'हा' उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. 

चोंदलेले नाक मोकळं करण्यास फायदेशीर 'हा' उपाय

मुंबई : वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. सर्दी, पडशाच्या समस्येमध्ये अनेकांना श्वास घेतानाही त्रास होतो. या त्रासामुळे चिडचिड होते. म्हणूनच अशा समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधगोळ्यांऐवजी घरगुती उपायांचा वापर करा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करून चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत होऊ शकते. 

कसा कराल उपाय? 

सर्दी, पडशामुळे नाक चोंदलं असेल तर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे दोन थेंब आणि अर्धा चमचा मध, ग्लासभर गरम पाण्यामध्ये मिसळून प्यावे. सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण प्यावे.  

लिंबू आणि मध 

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. चमचाभर लिंबाच्या रसामध्ये थोडं मध मिसळून हे मिश्रण नियमित 2-3 दिवस सकाळी प्यायल्यास मदत होते. सकाळी नियमित या मिश्रणाने दिवसाची सुरूवात केल्याने नाक मोकळे होण्यास मदत होते. 

Read More