Marathi News> हेल्थ
Advertisement

Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

असा असेल आजचा दिवस

Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

मुंबई : आजचा दिवस म्हणजे गुरुवार काही राशींसाठी अनुकूल असेल, तर काही राशींना थोडी मेहनत करण्याची गरज आहे. हातच्या गोष्टी जाऊ देऊ नका असा ही सल्ला काही राशीच्या लोकांसाठी देण्यात आला आहे.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांचा दिवस चांगला सुरू होईल. मनामध्ये सकारात्मक विचार येतील. कामात चांगले पैसे मिळतील. तुमचं कार्य कुशलतेने पूर्ण कराल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल.

वृषभ (Taurus)

तुम्ही दिवसभर फ्रेश राहू रहाल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये यश मिळेल. व्यवसायात देखील फायदा होईल. कौटुंबिक वाद संपतील. गुरुवारी चपळाईने तुम्ही तुमची प्रत्येक कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेत तसंच स्पर्धेत यश मिळेल.

मिथुन (Gemini)

तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. भाग्य तुम्हाला नक्की साथ देईल. मित्र आणि ओळखीच्यांबरोबर चांगला काळ जाईल.

कर्क (Cancer)

मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल, प्रवासाचा आनंद घ्या. व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यही चांगलं राहील.  परदेशात प्रवास करताना आनंद घ्याल.

सिंह (Leo)

दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आनंद प्रसन्न राहील. प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे.

कन्या (Virgo)

भाग्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. इतरांशी तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल.

तुला (Libra)

कौटुंबिक जीवनाच उतार-चढ़ाव दिसून येतील. परिश्रम आणि समजुतीने आयुष्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामात चांगला आर्थिक लाभ होईल. 

वृश्चिक (Scorpio)

दिवस फार चांगला जाणार नाही. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. म्हणून धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा. वडिलांकडून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या.

धनु (Sagittarius)

तुमच्यात आज उत्साह भरपूर असेल. नशीब तुमच्या बरोबर आहे, कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. आज तुमचा मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.

मकर (Capricorn)

नशीब तुमच्या सोबत आहे. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. तुमच्याकडे संवाद साधण्याची जी कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यास उपयुक्त ठरेल. 

कुंभ (Aquarius)

गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. गोड संवाद आणि आपल्या हुशारीच्या मदतीने आपण कामात यश प्राप्त कराल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगली स्थिती पाहायला मिळेल. तुमची आवड नवीन योजना बनवण्याकडे अधिक असेल आणि तुम्ही केलेल्या योजना फायदेशीर ठरतील.

मीन (Pisces)

कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणींपासून मुक्त होऊ शकता. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल. तुम्हाला काही भेटवस्तू मिळणार आहे. कठोर परिश्रम, समर्पण हे कामाच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल. परिणामी, क्षेत्रात चांगले यश मिळेल.

Read More