Marathi News> हेल्थ
Advertisement

उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या डायरियावर घरगुती उपचार लाभदायक

उन्हाळ्यात डायरियामुळे कित्येक जण त्रस्त असतात. डायरियाने फक्त पोटाच्या समस्या वाढवत नाहीत, तर शरीरात अशक्त पणा जाणवतो.

उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या डायरियावर घरगुती उपचार लाभदायक

मुंबई : उन्हाळ्यात डायरियामुळे कित्येक जण त्रस्त असतात. डायरियाने फक्त पोटाच्या समस्या वाढवत नाहीत, तर शरीरात अशक्त पणा जाणवतो. उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात डोकेवर काढते. जंक फूड्स आणि तेलकट पदार्थांच्या अती सेवनाने डायरिया होण्याची शक्यता असते. कोल्डड्रिंक्स प्यायल्याने हा त्रास ओढावतो. लोकांची पाचक शक्ती कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितील लोकं बाहेरच्या गोळ्या खाण्याला जास्त प्राधन्य देतात. कारण त्याने लगेच फरक जाणवतो, पण गोळ्याचे अतीसेवन करणे शरीरास घातक असते हे मात्र नक्की...
  
नारळ पाणी प्यावे
उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीरास अनेक फायदे होतात. डायरियारग्रस्त रूग्णांसाठी नारळपाणी अतिशय प्रभावशाली आहे. कारण नारळ पाण्यात जीवनसत्त्व आणि मिनरल्स योग्य प्रमाणात असतात. 

ओआरएस प्यावे
गर्मीमध्ये ओआरएस आरोग्यासाठी लाभदायक असतो. डायरियाच्या रूग्णांनी ओआरएस प्यायल्याने त्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. १ ग्लास पाण्यात १ चमचा मीठ आणि साखर एकत्र करून थोड्या थोड्या वेळाने त्याचे सेवन करावे. 

कच्चे केळे आणि तांदूळ 
डायरियाच्या रूग्णांनी कच्चे केळे आणि तांदूळ खाणे खूप फायद्याचे आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व आजाराला नियंत्रीत करण्याचे काम करते. त्याचबरोबर कच्चे केळे उकळून भात आणि मीठासह खाल्याने डायरियावर आराम मिळतो.  

डायरियाची लक्षणे
- पोटात दुखणे 
- शरीरात पाण्याची आणि मीठाची कमतरता 
- उल्टी, ताप अणि अंग दुखणे
- अशक्तपणा जाणवणे
- सतत चक्कर येणे

Read More