Marathi News> हेल्थ
Advertisement

दाढी,मिशीचे केस काळेभोर ठेवण्यासाठी मदत करतील 'हे' घरगुती उपाय

सौंदर्याच्या बाबतीमध्ये केवळ मुलीच जागृत असतात असे काही नाही.

दाढी,मिशीचे केस काळेभोर ठेवण्यासाठी मदत करतील 'हे' घरगुती उपाय

मुंबई : सौंदर्याच्या बाबतीमध्ये केवळ मुलीच जागृत असतात असे काही नाही. आज मुलींच्या इतकेच मुलांनादेखील त्यांच्या सौंदर्याची काळजी असते. अनेकजण त्यासाठी ब्युटीपार्लरमध्येही ट्रीटमेंटदेखील घेतात.वयाच्या विशिष्ट टप्प्यामध्ये आल्यानंतर केस पांढरे होणे स्वाभाविक आहे. मात्र आजकाल पोषक आहाराच्या अभावामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे केस अकाली पांढरे होणे.  दाढी मिशीचे केस अकाली पांढरे होत असतील तर केमिकलयुक्त रंगांची निवड करण्यापेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर आहे. 

घरगुती उपाय कोणते ? 

दाढी मिशीचे केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी नियमित पुदीन्याचा काढा/ चहा पिण्याची सवय ठेवा. 

ग्लासभर पाण्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं उकळा. हे पाणी मिशी आणि दाढीला लावा. या नियमित उपायाने केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते.  

नियमित मिशी आणि दाढीला साजूक तूपाचा मसाज केल्याने केस काळेभोर राहण्यास मदत होते.  

अर्धा कप पाण्यामध्ये दोन चमचे साखर मिसळा.यामध्ये अर्धा चमचा लिंबू पिळून मिसळा. हे मिश्रण दाढी आणि मिशीला लावल्यास केस काळे राहण्यास मदत होते.  

अर्धी वाटी तूर डाळ, आणि एका बटाट्याचा किस एकत्र करून दाढी मिशीला लावल्यास केस काळेभोर राहण्यास मदत होते. 

Read More