Marathi News> हेल्थ
Advertisement

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तूप फायदेशीर

आपल्या आहारामध्ये तूपाचा हमखास वापर केला जाते. 

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तूप फायदेशीर

मुंबई : आपल्या आहारामध्ये तूपाचा हमखास वापर केला जाते. काही गोडाचे पदार्थ तर तूपाशिवाय अपूर्णच वाटतात. वजन घटवण्यास अम्दत करते, आहारातील पदार्थांची चव वाढवणारे तूप केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील मदत करते हे तुम्हांला ठाऊक आहे का? मग केसांच्या आरोग्याबाबत तुम्हांला हमखास सतावणार्‍या या काही समस्यांवर तूप हे रामबाण उपाय ठरू शकते.  

फ्रिझीनेस - केसांमधील फ्रिझीनेझ कमी करण्यासाठी, केसांची चमक वाढवण्यासाठी तूप मदत करते. याकरिता टाळूवर तूपाचा मसाज करा. 15 मिनिटांनी केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत.  

केसांचे पोषण - तूपात अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केसांना कंडिशनिंग करण्यासाठी 2 टीस्पून तूपामध्ये 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल मिसळून लावावे. हे मिश्रण केसांना मूळापासून टोकापर्यंत लावा. 20 मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. 

दुतोंडी केस - स्प्लिटएन्ड म्हणजेच दुतोंडी केसांपासून सुटकाअ मिळवण्यासाठी तूप मदत करते. 3 टीस्पून तूप गरम करा. हे पातळ झालेले  तूप केसांना नीट लावा. केस 15 मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत. 

शुष्क केस - केसांना मुलायम करण्यासाठी तूप फायदेशीर ठरते. केस धुतल्यानंतर त्यावर थेट तूप लावावे. 20 मिनिटांनंतर केस पुन्हा धुताना पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा.  

कोंडा - टाळूवरील खाज कमी करण्यासाठी, कोंडा कमी करण्यासाठी तूपामध्ये लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाने टाळूवर मसाज करा. 20मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. 

स्काल्प इंफेक्शन - टाळूवर होणारे स्काल्प इंफेक्शन टाळण्यासाठी आठवड्यातून दोनदा तूपाचा मसाज करा. 20 मिनिटांनी केस नीट स्वच्छ धुवावेत. 

अकाली केस पांढरे होणे - अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केसांवर तेलाप्रमाणेच गरम तूप लावावे. त्यानंतर डोक्याला टॉवेल गुंडाळावे. 15 मिनिटांनी सौम्य शाम्पूचा वापर करून केस नीट धुवावेत. केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार

Read More