आपलं रक्त लाल रंगाचं असतं हे सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्ही जर कधी नीट पाहिलं असेल तर आपल्या नसांचा रंग हिरवा किंवा निळा असतो. मग अशावेळी डोक्यात विचार येतो की, रक्ताचा रंग लाल असताना नसा मात्र हिरव्या किंवा निळ्या का दिसतात? तुम्हालाही हा प्रश्न सतावत असेलतर यामागी रंजक कारण जाणून घ्या.
आपल्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन असतं, जे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतं. जेव्हा हे हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी मिळतं तेव्हा ते चमकदार लाल होते. हे रक्त आपल्या शरीरात वाहतं.
हा खरं तर एक भ्रम आहे जो आपल्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या संयुक्त युक्तीचा परिणाम आहे. प्रत्यक्षात, शिरा निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या नसतात. फक्त आपल्या डोळ्यांना त्या तशा दिसतात.
- जेव्हा प्रकाश आपल्या त्वचेवर पडतो तेव्हा तो वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो.
- लाल रंगाच्या लहरी जास्त असतात आणि त्या त्वचेत खोलवर जाऊ शकतात.
- निळ्या लहरी कमी खोलीपर्यंत प्रवास करतात आणि लवकर परावर्तित होतात.
यामुळे, आपले डोळे बहुतेक निळ्या लही टिपतात आणि आपल्याला शिरा निळ्या किंवा हिरव्या दिसतात.
ही खरं तर व्हिज्युअल ट्रीक आहे. आपले डोळे आणि मेंदू एकत्रितपणे आपल्याला जे रंग दाखवतात ते गरजेचं नाही की तसेच असावेत. नसांच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्वचेखालील पोत एकत्रितपणे एक भ्रम निर्माण करतात ज्यामुळे त्या निळ्या दिसतात.
अनेकांना वाटतं की निळा रंग नसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असलेले रक्त असल्यामुळे असतो. पण हे खरं नाही. ऑक्सिजनमुक्त रक्त देखील गडद लाल असते, पण निळे नाही. म्हणून निळा दिसणे हे केवळ प्रकाश आणि त्वचेच्या पोताचा परिणाम आहे, रक्ताच्या रंगाचा नाही.
गोरी त्वचा असलेल्या लोकांमध्ये शिरा बहुतेकदा अधिक स्पष्ट आणि निळ्या/हिरव्या दिसतात, तर गडद त्वचेमध्ये हा फरक कमी लक्षात येतो. त्वचेची जाडी, रंग आणि नसांची खोली या सर्व गोष्टी तुम्हाला शिरा कोणत्या रंगाच्या दिसतील हे ठरवतात.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, प्रत्येक माणसाचे डोळे रंगाबाबत सारखेच संवेदनशील नसतात. त्याच शिरा काहींना किंचित हिरव्या, काहींना निळ्या आणि काहींना राखाडी दिसू शकतात. ते पूर्णपणे तुमच्या व्हिज्युअल परसेप्शनवर अवलंबून आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर नसांचा खरा रंग निळा किंवा हिरवा नसतो, परंतु तो तसा दिसतो कारण आपले डोळे आणि मेंदू एकत्रितपणे प्रकाश किरणांना वेगवेगळ्या प्रकारे पाहतात आणि त्यांचा अर्थ लावतात. हे विज्ञान आणि दृष्टिभ्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि हे सिद्ध करते की तुम्ही जे पाहता ते नेहमीच वास्तव नसते.