Marathi News> हेल्थ
Advertisement

शिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.

शिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

मुंबई : वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.

काही जणांना शिंकण्याचा त्रास हा विशिष्ट वासाच्या अ‍ॅलर्जीने किंवा धूळीमुळे होतो. अशावेळेस चारचौघात काहीजण शिंकणं टाळतात. शिंकणं ही नैसर्गिकक्रिया असल्याने त्याला रोखणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. शिंक रोखण्यापेक्षा तोंडावर हात / रूमाल ठेवून शिंकावे यामुळे संसर्ग पसरत नाही.  

शिंक रोखणं आरोग्याला घातक  

नाक आणि तोंड बंद करून शिंकण्याची प्रक्रिया आरोग्याला त्रासदायक टरू शकते. हा प्रकार जीवघेणादेखील ठरू शकतो. याबाबत जगविख्यात डॉक्टरांनी जबरदस्ती शिंक रोखू नका असा सल्ला रूग्णांना दिला आहे.

एका रूग्णाचा आवाजच गेला  

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने जबरदस्ती नाक आणि तोंड बंद करून शिंकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती व्यक्तीच्या गळयात  गंभीर स्वरूपाचा त्रास निर्माण झाला. 

गळ्यामध्ये जळजळ जाणवल्यानंतर तो सुजला. त्याच्यावर ब्रिटनमधील लिसेस्टर युनिव्हर्सिटी रूग्णालयात  उपचार करण्यात आले आहे. 

भारतीय मूळ वंशाचे रघूविंदर एस सहोटा आणि सुदीप दाससह अन्य अनेक डॉक्टर या रुग्णावर उपचार करत होते. डॉक्टरांच्या मते, या रुग्णाने शिंक रोखल्यानंतर काही पदार्थ खाल्ला. हे खाल्ल्यानंतर त्याचा आवाज गेला. डॉक्टरांनी सात दिवस उपचार केल्यानंतर आता घरी पाठवले आहे. 

शिंक रोखू नका 

डॉक्टरांनी शिंक न रोखण्याचा सल्ला आणि आवाहन रूग्णांना केले आहे. शिंक रोखणे हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते.  

Read More