Marathi News> हेल्थ
Advertisement

IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine

IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समधील खेळाडू मयंक यादव आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळामुळे चर्चेत आहे. 155.8 KM/H वेगाने बॉल फेकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेणार आहोत. 

IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine

आयपीएल 2024 लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू मयंक यादव सध्या चर्चेत आहे. मयंकने आयपीएलमध्ये आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याला आयपीएल 2024 चा सर्वात 'वेगवान गोलंदाज' म्हटले जात आहे. ताशी 156.7 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा तो सर्वात 'वेगवान गोलंदाज' ठरला आहे. अतिशय फिट आणि तंदुरुस्त दिसणारा मयंक यादवचा फिटनेस नेमका कसा आहे. व्यायाम आणि डाएट त्याच्या रुटीनमध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतं हे समजून घेणे गरजेचे आहे. मयंक यादवच्या फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅनबद्दल जाणून घेऊया. 

मयांक यादवचं फिटनेस रुटीन

मयंक हा अत्यंत मेहनती खेळाडू आहे. महत्त्वाचं म्हणजे तो नियमितपणे व्यायाम करतो आणि त्याची शरीरयष्टी टिकवून ठेवण्यासाठी न चुकता एक्सरसाइज करतोय  अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी पुरेशी झोप, आहार आणि थकवा दूर करणे आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी मयंक न चुकता फॉलो करतो. इतर ऍथलीट्सप्रमाणे, त्याला कधीकधी आइस बाथ घ्यायला आवडते. 

कशी एक्सरसाइज करतो मयांक?

मयंक अनेकदा हाय इंटेसिटी वर्कआउट किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे पसंत करतो. तो नियमितपणे जिममध्ये किंवा घरी किमान 30 मिनिटांचा वर्कआउट करतो. ज्यामध्ये त्यांना स्क्वॅट्स, लंजी, बर्पी, बॉक्स जंप, स्केटर जंप, बेंच प्रेस, बारबेल स्क्वॅट्स, जंपिंग, पुलअप्स आणि पुशअप्स इत्यादी प्रकार करायला आवडतात. एवढेच नाही तर ते फिटनेसशी संबंधित इतर शारीरिक ऍक्टिविटी देखील करतो. ज्यामध्ये एरोबिक्स, सायकलिंग, पोहणे आणि धावणे यासारख्या गोष्टी करतो. 

(हे पण वाचा - IPL 2024: 'माझा मुलगा गेल्या 2 वर्षांपासून फक्त...', मयांक यादवच्या आईचा खुलासा)

मयांक यादव डाएट प्लान

मयंक शरीरातील फॅटचे प्रमाण वाढू देत नाही, यासाठी तो अतिशय काटेकोर आणि साधा आहार पाळतो. मयंक फास्ट आणि प्रोसेस्ड फूडसारखे बाहेरचे अन्न खाणे पूर्णपणे टाळतात. मयंक हा शाकाहारी आहे, त्यामुळे त्याला हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सलाड वगैरे खायला आवडतात. मयंक न्याहारी आणि दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घेतो आणि रात्रीचे जेवण अगदी हलके असते. महत्त्वाचं म्हणजे मयंक पूर्ण शाकाहारी आहे. पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग भागात राहणाऱ्या यादव कुटुंबासाठी एका रात्रीत सर्व काही बदलले. मयंक संपूर्ण देशाचा आवडता क्रिकेटर बनला आहे. दिव्येंद्र शर्मा यांनी सांगितले की, मयंक हा शुद्ध शाकाहारी आणि भगवान कृष्णाचा कट्टर भक्त आहे.

Read More