Marathi News> हेल्थ
Advertisement

कडक उन्हाळ्यातील काम्या पंजाबीचा 'कूल' फंडा सोशल मीडियात व्हायरल !

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी टेलिव्हिजनच्या माध्यामातून घराघरात पोहचली आहे.

कडक उन्हाळ्यातील काम्या पंजाबीचा 'कूल' फंडा सोशल मीडियात व्हायरल !

मुंबई : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी टेलिव्हिजनच्या माध्यामातून घराघरात पोहचली आहे.

सोशल मीडियावर काम्या सतत अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यातील लहान मोठे अपडेट्स सतत सोशल मीडियावर शेअर केले जातात. आता काम्याने एक नवा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.   

इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ 

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू काम्याने उन्हाळयावर मात करण्यासाठी पूल टाईम एन्जॉय केला. 

स्विमिंग पूलमधील फोटो शेअर  करताना काम्याने त्यासोबत खास कॅप्शनही दिलं होतं. “My mistakes My choices No Regrets.”  

 

 

My mistakes My choices No Regrets 

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

नकारात्मक भूमिकेत काम्या 

सध्या काम्या पंजाबी 'शक्ती - अस्त्वित्त्व के एहसास की' या हिंदी मालिकेत  एक नकारात्मक भूमिका साकारत आहे. काम्या पंजाबीचा वॅम्प म्हणजे खलनायिकेच्या स्वरूपातातील भूमिका अधिक लोकप्रिय होत आहे. 

बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्येही काम्या पंजाबी सहभागी झाली होती. या सीझनमध्ये काम्या आणि प्रत्युषा बॅनर्जी एकत्र होत्या. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर मीडियासमोर येऊन तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.  

Read More