प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. नुकतेच कपिल शर्मा विमानतळावर दिसला. या काळात तो खूप बारीक दिसत होता. कपिलने अनेक किलो वजन कमी केले आहे. यानंतर, चाहत्यांचा असा विश्वास आहे की कपिल आता अधिक तंदुरुस्त झाला आहे. तर अनेक चाहत्यांनी तो आजारी दिसत असल्याचे सांगितले.
कपिल शर्माचे वजन कमी झाल्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडिया वापरकर्तेही त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत पडले. ओझेम्पिक बद्दलही चर्चा सुरू झाली आहे. या औषधाच्या वापरामुळे विनोदी कलाकाराचे वजन कमी झाले आहे असे चाहत्यांचे मत आहे. यापूर्वी करण जोहर आणि राम कपूर सारख्या प्रसिद्ध व्यक्तींवरही असेच आरोप करण्यात आले आहेत. कपिलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध कमेंट्स केल्या.
कपिल शर्माला नुकतेच विमानतळावर पाहिले गेले. यावेळी तो राखाडी रंगाच्या पोशाखात दिसला. त्याने राखाडी शूज आणि काळ्या चष्म्यामध्ये दिसत आहे. युझर्सला कपिलचा हा ट्रान्सफॉर्मोशन पाहून खूप मोठा धक्का बसला आहे. कारण तो पूर्वीपेक्षा खूपच बारीक दिसत होता. कपिल शर्माचा वजन कमी करण्यावर युझर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच त्याच्या प्रकृतीबद्दलही लोक चिंता व्यक्त करत आहेत.
कपिल शर्माने कमी वेळात सुमारे 10 ते 11 किलो वजन कमी केलं केले. यासाठी त्याने काय खाल्ले आणि किती वेटलॉस केली याची माहिती त्याचे फिटनेस प्रशिक्षक योगेश भटेजा यांनी दिली आहे. योगेश यांनी सांगितले की, वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान कपिलच्या आहारात भाज्या आणि फळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते. याचा फायदा केवळ शरीरालाच नाही तर त्वचेलाही झाला.
याशिवाय कपिलच्या आहारात मासे आणि भरपूर सॅलड देखील समाविष्ट करण्यात आले. तो उकडलेले अन्न खाऊ लागला. यामुळे त्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत झाली. योगेशच्या मते, कपिल त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात दररोज 2 तास वर्कआऊट करायचा. वर्कआऊटकडे त्याने कधीच दुर्लक्ष केलं नाही. कितीही काम असले तरी कपिल दररोज व्यायाम करत असे. कपिल शर्माच्या वर्कआउटमध्ये हायड्रो वर्कआउटचा मोठा समावेश असल्याच कोच सांगतात. यासोबतच त्याने वेट ट्रेनिंग आणि किक बॉक्सिंग देखील केले.