Marathi News> हेल्थ
Advertisement

तुम्ही देखील पोटावर झोपता ? आजच सोडा ही सवय, अन्यथा..

पोटावर झोपण्याची सवय नुकसानदायी ठरु शकतं.

तुम्ही देखील पोटावर झोपता ? आजच सोडा ही सवय, अन्यथा..

नवी दिल्ली : सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप मिळणं गरजेचं असतं. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील महत्वाची असते. अनेकजणांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटतं. पण असं करण त्यांच्यासाठी नुकसानदायी ठरु शकतं. 

पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला देखील पोटावर जोर देऊन झोपण्याची सवय असेल तर आजच बदला.

सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम

पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखीचा (Joint Pain), मान दुखणं  (Neck Pain) आणि पाठदुखीची वेदना (Back Pain) सुरू होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्‍या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो.

मानेमध्ये वेदना

पोटावर झोपेमुळे मानदुखी (Neck Pain) होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही.

डोक्यात तीव्र वेदना

पोटावर जोर देऊन झोपल्याने डोकेदुखी(Headache) होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण (Blood Circulation) योग्यरित्या होत नाही आणि मग डोकेदुखी सुरू होते.

Read More