Marathi News> हेल्थ
Advertisement

Masterbation मुळे स्पर्म काऊंटवर होतो परिणाम? हस्तमैथुनाबाबतचे काही फॅक्ट्स

हस्तमैथुनाबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न असतात.

Masterbation मुळे स्पर्म काऊंटवर होतो परिणाम? हस्तमैथुनाबाबतचे काही फॅक्ट्स

मुंबई : मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथुन. सहसा, आपल्या देशात याबद्दल फारच कमी बोललं जातं. याचं कारण म्हणजे आजही लैंगिक हस्तमैथुन निषिद्ध मानलं जातं. समाजात या गोष्टींला किंवा त्याकडे फार अत्यंत वाईट मानलं जातं. असे काही लोक आहेत जे हस्तमैथुन करतात, परंतु त्याच्याशी संबंधित काही चुकीचे समजही आहेत. काहीजणांच्या म्हणण्याप्रमाणे, यामुळे शरीर अशक्त होतं आणि नपुंसकत्व येतं. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाहीये.

एवढंच नाही तर हस्तमैथुनाबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न असतात. जाणून घेऊया हस्तमैथुनाशी संबंधित अशाच काही समजांबद्दल.

सर्व पुरुष हस्तमैथुन करत नाहीत

जर तुम्हाला वाटत असेल की जगभरातील पुरुष हस्तमैथुन करतात, तर ही गोष्ट चुकीची आहे. 2016 च्या अभ्यासानुसार, फक्त 57%  पुरुष दररोज हस्तमैथुन करतात.

चेहरा ग्लो करत नाही

हस्तमैथुन केल्याने तुमचा चेहरा ग्लो होईल असं काही नाहीये. एका संशोधनानुसार, जे पुरुष वारंवार हस्तमैथुन करत राहतात, ते आनंदी राहतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही निरोगी राहते. हस्तमैथुनामुळे ऊर्जा देखील वाढते.

स्पर्म काउंट

जपानमध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलंय की, सेक्स दरम्यान बाहेर पडणाऱ्या सिमेनमधील स्पर्मची संख्या हस्तमैथुनाच्या स्पर्मच्या संख्येपेक्षा जास्त असते. स्पर्मची संख्या तुमच्यावर किती सेक्शुअली चार्ज आहे यावर अवलंबून आहे.

Read More