Marathi News> हेल्थ
Advertisement

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते.

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

मुंबई : जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते. बाहेर फिरल्याने सुर्याची किरण आपल्या शरीरावर डायरेक्ट पडतात, ज्यामुळे स्किन टॅनिंगची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यानंतर तुम्ही उन्हात बाईकवरून प्रवास करू केला तरी तुमची स्किन टॅन होणार नाही.

यूवी प्रोटेक्शन हेल्मेट घाला

तीव्र सूर्यप्रकाशाचा केवळ तुमच्या त्वचेवरच परिणाम होत नाही, तर तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे, हेल्मेट खरेदी करताना, तुमच्या हेल्मेटचा व्हिझर पॉली कार्बोनेटचा आहे याची खात्री करा. कारण ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक यूवी किरणांपासून वाचवण्यास मदत करते. याच्या मदतीने चेहऱ्यावरील सनबर्न टाळता येते.

स्कार्फ घाला

सनबर्न व्यतिरिक्त, सुर्यप्रकाशात म्हणजेच दुपारच्या कडक उन्हात जास्त काळ राहिल्याने टॅनिंग होऊ शकते आणि जर तुम्हाला असे घडू नये असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेटच्या आता स्कार्फ घालू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यापासून ते मानेपर्यंत तुम्हाला सनबर्न होणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही.

संपूर्ण शरीर झाकून टाका

सुर्याच्या प्रखर किरणांपासून संपूर्ण शरीराचं संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शरीर झाकून बाईकवरुन जा. पूर्ण पँट, फुल स्लीव्ह शर्ट किंवा टिशर्ट आणि शूज घालूनच बाइक चालवा. याशिवाय हातावर ग्लोव्हज घातले तर आणखी चांगलं.

Read More