Marathi News> हेल्थ
Advertisement

2018 मधील पहिलं हृदय प्रत्यारोपण यशस्वी

 2018 तील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात करण्यात आली.

2018 मधील पहिलं हृदय प्रत्यारोपण यशस्वी

मुंबई : 2018 तील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात करण्यात आली.

 हृदय प्रत्यारोपण फोर्टिस रुग्णालयात, यकृत मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयाला तर किडनी बॉम्बे रुग्णालयात पाठवण्यात आल्या आहेत. आणि या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याचं सांगण्यात आलं आहे. सैन्यदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात नौसेनेच्या अधिकाऱ्याने आपल्या ५३ वर्षीय पत्नीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. नौदलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा अपघात झाला होता. तिच्यावर आयएनएस अश्विनीत उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान डॉक्टरांनी या महिलेला ब्रेनडेड घोषीत केलं.

माय मेडिकल दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या उर्मिला महाजन म्हणाल्या, “बुधवारी संध्याकाळी उशीरा अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. हृदय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात तर यकृत ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आलंय.”

नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयामुळे अवयवांच्या प्रतिक्षेत असलेल्या चार लोकांना नवजीवन मिळाल आहे. यामुळे या लोकांनी नौदलाच्या अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत. 

Read More