Marathi News> हेल्थ
Advertisement

ओमायक्रॉनचा मेंदूवर होतोय परिणाम; काय आहे नेमकं Brain Fog?

Oxford Universityच्या संशोधकांच्या मते, हे ओमायक्रॉनचं असं लक्षण आहे जे अनेक महिने दिसून येतं. याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो.

ओमायक्रॉनचा मेंदूवर होतोय परिणाम; काय आहे नेमकं Brain Fog?

मुंबई : ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांनी प्रत्येक जण हैराण आहे. त्यातच आता ओमायक्रॉनची नवीन लक्षणं समोर आली आहेत. दुसरीकडे हलका खोकला आणि सर्दीमध्येही लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह येतेय. काहीवेळा कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय. दरम्यान या ओमायक्रॉनचा शरीरावरच नव्हे तर मेंदूवरही परिणाम करतो.

Oxford Universityच्या संशोधकांच्या मते, हे ओमायक्रॉनचं असं लक्षण आहे जे अनेक महिने दिसून येतं. याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो. या लक्षणाला ब्रेन फॉग असं नाव देण्यात आले आहे. या ब्रेन फॉगमुळे दैनंदिन कामातही अडचणी येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसतानाही ब्रेन फॉग दिसून येतंय. या अभ्यासात, संशोधकांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्या दिसून आल्या.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. सिजिया झाओ म्हणाले, "कोरोना रूग्णांना चाचणीच्या वेळी इतर कोणतीही लक्षणं जाणवली नाहीत. परंतु त्यांच्याच लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे." आम्ही केलेल्या अभ्यासाचे परिणाम असं सांगतात की, ही लक्षणं लोकांमध्ये अनेक महिने टिकून राहू शकतात.

प्रोफेसर मसूद हुसेन म्हणाले, "स्मरणशक्तीवर असा प्रभाव का पडतो हे अजून समजलेलं नाही. दरम्यान संसर्ग झाल्यानंतर 6 ते 9 महिन्यांनंतर रुग्णाची परिस्थिती सामान्य होत असल्याचं दिसून आलं. पूर्वीच्या अभ्यासातून असं दिसलं होतं की, दीर्घकाळापर्यंत संसर्ग झालेल्या कोरोनाच्या रुग्णांना खोकला, मसल पेन, निद्रानाश यांसारख्या इतर लक्षणांसह ब्रेन फॉग देखील होऊ शकतं."

Read More