पॉलीसिस्टिक ओरी सिंड्रो म किंवा पीसीओएस हा महिलांमध्ये आढळणारा अंत:स्रावी ग्रंथीचा एक सर्वज्ञात आजार आहे. यात मासिक पाळी अनियमित होते किंवा मासिक पाळीचा अभाव असू शकतो, अंडाशयावर गळू येतात (पॉलीसिस्टिक ओरीस) आणि अँड्रो जेन या पुष संप्रेरकाची वाढ होऊ शकते. या आजाराच्या शारीरिक परिणामांची माहिती आपल्याला असली, तरी या आजाराचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत आपल्याला पुरेशी माहिती नाही. पीसीओएस झालेल्या भारतीय महिलांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण जास्त असते असे आधीच्या एका संशोधनाने अधोरेखित झाले आहे.
उदाहरणार्थ, पीसीओएस महिला सामाजिक कार्यक्रमांना जाणे टाळतात कारण वाढलेल्या वजनाबाबत किंवा अनियमित मासिक पाळीने हैराण झाल्यामुळे नैराश येते. लक्ष केंद्रित करण्यावर पीसीओएसमुळे काय परिणाम होतो ह्याचा जास्त अभ्यास झालेला नाही. माहिती प्राप्त करणे, समजून घेणे आणि अर्थ लावणे अश्या सर्व महत्वाच्या आकलन क्रियांचे अग्रदूत एकाता आहे. एकाग्रता किंवा लक्षकेंद्रीत करणे ही एक गुंतागुंतीची क्रिया आहे ज्यामध्ये असंबद्ध माहितीकडे दुर्लक्ष करुन केवळ संबंधित माहितीवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट असते. याशिवाय विभाजित लक्ष आपल्याला एकाच वेळी अनेक कार्ये हाताळण्यास आणि प्रतिसाद देण्यास मदत करते.
अलीकडच्या एका अभ्यासात भारतीय तंज्ञान संथा मुंबईच्या मानव्य आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या मैत्रेयी रेडकर आणि प्रा. अझिझुद्दीन खान यांनी पीसीओएसमुळे केंद्रित आणि विभाजित लक्षावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. १०१ पीसीओएस महिला आणि ७२ निरोगी महिला एकाग्रपणे करावी लागतील अशी कार्ये असलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी झाल्या. चाचण्यांमध्ये भाग घेण्यापूर्वी सहभागी महिलांच्या संप्रेरक पातळीचे मूल्यांकन करण्यात आले. कार्य-आधारित चाचण्यांमधून असे दिसून आले की, पीसीओएस असलेल्या महिला निरोगी महिलांच्या तुलनेत मंदगतीने तिक्रिया देतात आणि अधिक सहजपणे विचलित होतात.
मानसिक थकव्यामुळे आलेले आजार जसे की चिंता आणि नैरा याचा पीसीओएसशी संबंध आहे ज्यामुळे विभाजित लक्ष देऊन करण्याची कार्ये आव्हानाक होतात. या अभ्यासाच्या निर्षांवन असे दिसून येते की, विभाजित लक्ष देण्याची कामे करताना अचूकता कमी झाल्यामुळे रणशक्तीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे माहिती तात्पुरती साठवून ठेवण्यास अडथळा येतो. यामुळे दैनंदिन कामे जसे की वाहन चालवताना दिशानिर्देशांचा अंदाज ठेवणे किंवा फोन नंबर लक्षात ठेवून फोन लावणे हे अधिक आव्हानात्मक होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)