Marathi News> हेल्थ
Advertisement

चहासाठी प्लास्टिकची गाळणी वापरल्यामुळे कॅन्सर होतो का? डॉक्टर काय सांगतात?

चहा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक, पदार्थ होत चालला आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. पण हाच चहा गाळण्याची पद्धत तुम्हाला कॅन्सरच्या जवळ नेत आहे. 

चहासाठी प्लास्टिकची गाळणी वापरल्यामुळे कॅन्सर होतो का? डॉक्टर काय सांगतात?

अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरात तयार होणारा पहिला पदार्थ म्हणजे चहा असतो. अनेकांना काळा चहा आवडतो तर काहींना भरपूर दूध टाकून केलेला चहा आवडतो. मात्र चहा हा गाळूनच घेतला जातो. अनेकजण चहा गाळण्यासाठी प्लास्टिकच्या गाळणीचा वापर केला जातो. पण हीच गाळणी तुम्हाला चहा गाळण्यास मदत करते असं नाही तर कॅन्सरच्या देखील जवळ नेत आहे. या संदर्भात डॉक्टर, तज्ज्ञ काय सांगतात? तसेच Fact Check काय आहे हे जाणून घेऊया. 

प्लास्टिक गाळणीतील 'तो' पदार्थ घातक 

प्लास्टिकच्या गाळणी न वापरण्याचे कारण मायक्रोप्लास्टिक्स असल्याचे सांगितले गेले आहे. जेव्हा गरम चहा प्लास्टिकच्या गाळणीतून गाळला जातो तेव्हा तुमच्या चहामध्ये असंख्य मायक्रोप्लास्टिक्स विरघळतात. याचे नियमित सेवन केल्याने भविष्यात कर्करोगच नाही तर इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. गर्भधारणेत अडचण आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या शारीरिक समस्या घातक ठरु शकतात. 

प्लास्टिकच्या चाळणीतून मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडतात यावर डॉक्टर सहमत आहेत. ते म्हणतात की हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते आणि नंतर कर्करोग होऊ शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपल्या शरीरात मायक्रोप्लास्टिक्स जमा होऊ शकतात. काही काळानंतर, ते आपल्या पचनसंस्थेला, रक्तप्रवाहाला आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवू लागते. यावर पुरेसे संशोधन झालेले नाही, परंतु भविष्यात मायक्रोप्लास्टिक्समुळे कर्करोग होऊ शकतो यात शंका नाही.

प्लास्टिक नाही तर मग पर्याय काय? 

प्लास्टिक गाळणी वापरायची नाही मग त्याला पर्याय काय? तर अशावेळी डॉक्टर सांगतात की, स्टीलची गाळणी वापरु शकतात. एवढंच नव्हे तर पारंपरिक पद्धतीने कपड्याने चहा गाळू शकता. तसेच चहा गाळताना स्टीलचा गाळणी वापरत असाल तर ती देखील 4 ते 6 महिन्यात बदलावी. अनेक महिने एकच गाळणी वापरणे धोक्याचे ठरु शकतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

Read More