Marathi News> हेल्थ
Advertisement

तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या

अनेकांना जास्त वजनामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तरुणीने 15 महिन्यात तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे. कसा होता डाएट प्लान?

तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या

वजन कमी करणे अनेकदा कठीण काम असते, असा बहुतेकांचा अनुभव आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वानुभावावरुन वजन कमी करण्याचा प्रवास उलगडते तेव्हा. ज्या व्यक्तींचा मेटाबॉलिज्म कमी असतो तेव्हा वजन कमी करण्यात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या तरुणीने 15 महिन्यात तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे. 

एकदा तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली की, तुमचे स्वरूप बदलते, विशेषतः हनुवटी, गाल आणि जबड्याभोवती. टोरंटो येथील फिटनेस कोच साची पै ने 15 महिन्यांत 90 पौंड म्हणजे 40.8 किलो वजन कमी केल्यानंतर असाच बदल अनुभवला. ज्यामुळे त्यांच्या जबड्याची रेषा अधिक स्पष्ट झाली आणि गालावरची चरबी कमी झाली. साची यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी वजन कमी केल्यानंतर त्यांचा चेहरा कसा बदलला हे स्पष्ट केले.

पहा कशी होती वेट लॉस जर्नी?

 फक्त ३ गोष्टींची महत्त्वाच्या

१. कॅलरी कमी करणारा आहार आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या

२. व्यायाम, शक्यतो ताकद, कार्डिओ आणि संतुलन यांचे मिश्रण.

३. हळूहळू ध्येये साध्य करण्यासाठी मानसिकता

त्यानंतर तिने एक महत्त्वाची टीप शेअर केली -

सुरुवातीला वजन न वाढवता सुरुवात करा. कारण पहिल्याच महिन्यात वजन कमी करण्यावर फोकस केला तर जास्त त्रास होईल. अशावेळी तुम्ही वजन न वाढवण्याकडे लक्ष द्या. यासाठी काय कराल?

1- तुमच्या घरातून जंक फूड हद्दपार करणे.

2 -आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त बाहेर खाऊ नका.

3 - कोल्ड्रिंक्स/पॉप/साखरयुक्त अल्कोहोल किंवा साखरेची कॉफी पिणे बंद करा.

दिवसातून फक्त एका जेवणावर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ, साचीने नाश्त्यात बदल करून ग्रीक दही + प्रोटीन शेक + फळ किंवा अंडी + एवोकॅडो टोस्ट असे जेवण घेण्याचा सल्ला दिला. त्याने पुढे म्हटले की, अशाच पद्धतीचं आहार तिने दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात घेण्याचा सल्ला दिला. हा बदल महिनाभर पाळण्याचा सल्ला तिने आपल्या अनेक वेट लॉस करणाऱ्या व्यक्तींना दिला. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

Read More