Marathi News> हेल्थ
Advertisement

Salmonellosis : चॉकलेटमुळे जगभरात पसरला आजार; चॉकलेट कंपनीची चूक जगाला भुर्दंड?

Salmonellosis : जगभरातले अनेक लोक आजारी पडू लागल्यानंतर WHO नं चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे चॉकलेट खाल्ल्यामुळे हा आजार झालाय. 

Salmonellosis : चॉकलेटमुळे जगभरात पसरला आजार; चॉकलेट कंपनीची चूक जगाला भुर्दंड?

Salmonellosis : चॉकलेट खाताय...., तर सावधान, असा इशारा आम्ही नव्हे तर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंच दिला आहे. कारण बेल्जियमच्या चॉकलेट कंपनीच्या चुकीमुळे जगभर नवा आजार पसरण्याची भीती आहे. १०० पेक्षा जास्त देशांध्ये सॅलमोनेलोसिस ( Salmonellosis ) हा आजार परसलाय. 

जगभरातले अनेक लोक आजारी पडू लागल्यानंतर WHO नं चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे चॉकलेट खाल्ल्यामुळे हा आजार झालाय. 

बेल्जियममधल्या एका चॉकलेट कंपनीमधून हा आजार जगभर पसरला. सॅलमोनेलोसिस ( Salmonellosis ) हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहेतो चॉकलेट तयार करणा-या कंपनीच्या टँकमध्ये सापडला. टँकमधल्या चॉकलेटच्या माध्यमातून हा आजार ११३ देशांमध्ये पसरलाही चॉकलेटस खाल्ल्यानं ११ देशांतले १५१ संशयित रुग्ण बाधित झालेत

'सॅलमोनेलोसिस' ( Salmonellosis ) नावाचा बॅक्टेरिया प्राण्यांमध्ये आढळतो. त्यामुळे चॉकलेट खाण्याबरोबरच नॉनव्हेज खातानाही खबरदारी घ्या.

प्राण्यांमध्ये 'सॅलमोनेलोसिस' बॅक्टेरिया असेल आणि त्यांचं मास पूर्ण शिजलं नाही तर त्यातून माणसांना संसर्ग होण्याची शक्यता असते. कधीकधी दूषित पाण्यातूनही या बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतोहा बॅक्टेरिया आतड्यांवर हल्ला करतो ताप, पोटदुखी, उलट्या, जुलाब अशी याची लक्षणं आहेत. 

एखाद्या प्राण्यामुळेच बेल्जियमच्या चॉकलेट टँकमध्ये 'सॅलमोनेलोसिस'चा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. सध्या तरी चॉकलेट खाल्ल्यानं हा आजार झाल्याचे रुग्ण युरोपातल्या देशात आणि अमेरिकेत सापडलेत. बेल्जियमच्या कंपनीनं त्या काळात उत्पादित झालेली चॉकलेटस जगभरातून परत मागवलीयत. तरीही तुम्ही सावध राहा आणि खबरदारी घ्या !

Read More