Marathi News> हेल्थ
Advertisement

बघा तुमची नखं आरोग्याबाबत काय संकेत देतायत!

पहा नखांचा शेप आणि रंग यांचा तुमच्या आरोग्याशी कसा संबंध असतो. 

बघा तुमची नखं आरोग्याबाबत काय संकेत देतायत!

मुंबई : तु्म्ही कधी नखांना निरखून पाहिलंय का? ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या नखांना नीट निरखून पहाल. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नखांचा शेप आणि रंग यांचा तुमच्या आरोग्याशी कसा संबंध असतो. जर तुम्ही नखांना नीट पाहिलत तर तुम्ही गंभीर आजारांपासून वाचू शकता.

तुटलेली नखं

तुटलेली नखं म्हणजे तुमची नख कमकुवत आहेत. अशा नखांचा अर्थ म्हणजे तुमच्या शरीरात आवश्यक पोषकतत्वांची कमी आहे. जेव्हा नखांचे कोपरे मोडले जातात ओनिकोस्चिजिया म्हणतात. दुसरीकडे, जेव्हा ज्या ठिकाणांहून नखं वाढतात त्या दिशेने तुटल्यास त्याला ओनीकोरहेक्सिस म्हणतात.

नखांचा रंग फिका असणं

नखेचा रंग फिका होणं हे वृद्धत्वाचं सामान्य लक्षण आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांच्या नखांचा रंह फिका झालेला दिसतो. काही प्रकरणांमध्ये, नखांचा रंग आरोग्यविषयक समस्यांची लक्षणं दर्शवतो. जसं की, शरीरात रक्ताची कमतरता, कुपोषण, यकृताच्या समस्या किंवा हृदयाचा त्रास. 

नखांवर पांढरा डाग असणं

काहीवेळा दुखापतीमुळे तुमच्या नखांवर पांढरा डाग येतो. मात्र जर तुमची सर्व नखं हळूहळू पांढरी होत असतील तर त्याविषयी डॉक्टरांशी बोला. जेव्हा पांढर्‍या नखाच्या शेवटी गुलाबी रेखा दिसते तेव्हा त्याला टेरीज नेल म्हणतात. अशी नखं ​​यकृताच्या समस्या, किडनीच्या समस्या आणि हार्ट बिघाड यांसारख्या आजारांना सूचित करतात.

नखं पिवळी होणं

पिवळ्या रंगाची नखं फंगल इंफेक्शनमु उद्भवतात. अशी नखं ​​सोरायसिस, थायरॉईड आणि मधुमेह या आजारांचे संकते असू शकतात. यलो नेल सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार अशा लोकांमध्ये आढळतो ज्यांना फुफ्फुसांशी संबंधित समस्या आहे. 

नखांचा रंग निळा पडणं

नखे निळी होण्याची अनेक कारणं असू शकतात. याला ब्लू पिगमेंटेशन म्हणतात. सहसा चांदीच्या अति संपर्कात आल्यामुळे असं होऊ शकतं. मलेरिया, हार्ट रेट कंट्रोल कऱणारी औषधं आणि यकृतासंबंधी औषधांच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं नखं निळी पडण्यासाठी कारणीभूत ठरतात.

Read More