Marathi News> हेल्थ
Advertisement

ओमायक्रॉनची दहशत; व्हेरिएंटचा धोका पाहता 500 बेड्सचं रूग्णालय तयार

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 113 रुग्ण आढळले आहेत.

ओमायक्रॉनची दहशत; व्हेरिएंटचा धोका पाहता 500 बेड्सचं रूग्णालय तयार

दिल्ली : कोविडच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएं रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशात या व्हेरिएंटचे 113 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता भीती वाढू लागली आहे. राजधानी दिल्लीत एका दिवसात आढळलेल्या कोविडच्या नवीन रुग्णांनी गेल्या चार महिन्यांचा विक्रम मोडला आहे. धोका आता आपल्या दिशेने वेगाने सरकत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अशा परिस्थितीत सरकारही आता अलर्ट मोडवर आलं आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता दिल्लीतील रामलीला मैदानावर 500 बेड्सचं उच्च तंत्रज्ञान असलेलं कोविड रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.

एलएनजेपी रुग्णालयाचे संचालक डॉ सुरेश कुमार यांनी सांगितलं की, या ठिकाणी 500 खाटा बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बेडचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे हायटेक आहे. सर्व 500 बेड्स पॅरामाउंट बेड आहेत. या सर्व बेडवर पोर्टेबल व्हेंटिलेटर बसवण्यात आले आहेत. 

सोबतच या खाटांवर देखरेख यंत्रणाही बसवण्यात आली आहे. पोर्टेबल व्हेंटिलेटरसोबतच व्हेंटिलेटरही ठेवण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण गंभीर आढळल्यास त्याला कायमस्वरूपी व्हेंटिलेटरची सुविधा दिली जाणार आहे.

कोविडची भीषणता टाळण्यासाठी रामलीला मैदानाचे पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम 24 तास रुग्णालयात उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी काही कोरोना विषाणू-संक्रमित आणि ब्लॅक फंगसचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read More