Marathi News> हेल्थ
Advertisement

नशा करण्यासाठी Flavored Condoms असा केला जातोय वापर!

मात्र प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, हे तरूण कंडोमच्या माध्यमातून नशा कसे करतात.

नशा करण्यासाठी Flavored Condoms असा केला जातोय वापर!

कोलकाता : एखाद्या गोष्टींचं व्यसन माणसाला शरीराबरोबरच त्याचं आयुष्यंही उध्वस्त करतं. आजच्या काळात बाजारात असे अनेक प्रोडक्ट आहेत ज्या माध्यामातून  लोक नशा करतात. यामध्ये रंग, कफ सिरप, पेट्रोल, टायर पंक्चर ट्यूब, नेलपॉलिश यांचा वापर केला जात आहे. अशातच आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

तुम्हाला हे विचित्र वाटेल, पण पश्चिम बंगालमधील तरुण कंडोमची नशा करतानाचं समोर आलं आहे. कंडोमची विक्री अचानक वाढल्याने बाजारातून कंडोम संपले आहेत. मात्र प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, हे तरूण कंडोमच्या माध्यमातून नशा कसे करतात.

कसा केला जातो कंडोमद्वारे नशा

दुर्गापूरमध्ये अनेक विद्यार्थी राहतात जे घरापासून दूर वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहून त्यांना सिगारेट, दारू अशा अनेक प्रकारच्या नशेचं व्यसन लागलंय. अल्कोहोल आणि इतर नशा कंडोमपेक्षा खूप महाग आहेत. कंडोम खिशाला परवतं आणि ते घेण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही गरज नसते. त्यामुळे विद्यार्थी फ्लेवर्ड कंडोमची नशा करत आहेत.

फ्लेवर्ड कंडोमचा वापर नशा म्हणून केला जातोय, असा खुलासा एका विद्यार्थ्याने केलाय. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधान नगर, बेनाचिटी आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन दुर्गापूर भागात कंडोमची मागणी अधिक वाढली होती. 

या ठिकाणी विक्री वाढू लागल्यावर एका दुकानदाराने विद्यार्थ्याला याबद्दल विचारलं. जेव्हा दुकानदाराने त्याच्या नियमित ग्राहकाला विचारलं की, तो दररोज कंडोम का घेऊन जातो, तेव्हा त्याने सांगितले की तो नशा करण्यासाठी दररोज कंडोम खरेदी करतो.

कंडोमने नशा करणं खूप धोकादायक 

रसायनशास्त्राचे शिक्षक नूरुल हक यांच्या मते, फ्लेवर्ड कंडोमच्या नशेत विषारी कपाऊंड्स असू शकतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे त्याची नशा टाळावी. सध्या तरूणांना नशा करणं चांगलं वाटत असलं तरी भविष्यात त्याचे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात.

Read More