आरोग्यासाठी आपण रोज आंघोळ करतो. आंघोळीमुळे शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यालाही फायदा होतो. उत्तम आरोग्यासाठी आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी आंघोळ करणे अशुभ मानले गेले आहे. तर यामागे वैज्ञानिक कारणही सांगण्यात आलंय. (should not take bath at this time as it is inauspicious according to astrology here is the scientific reason in marathi)
ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी आंघोळ करणे अतिशय अशुभ मानले गेले आहे. शास्त्रांमध्ये याला राक्षसी स्नान असं म्हटलं जातं. जे लोक दुपारी 12 नंतर आंघोळ करतात, त्यांचं जीवन उद्धवस्त होतं. अशा लोकांचं चंद्र, शनि आणि राहू हे तीन ग्रह खराब होतात. या ग्रहांच्या बिघडल्यामुळे ग्रहण आणि विषयोग तयार होतो. या योगामुळे त्यांच्या वडिलांना आणि मुलाला भविष्यात त्रास सहन करावा लागतो. कुटुंबात कधीही शांती आणि सुख नांदत नाही. अशा लोकांचं काम होता होता थांबतं.
म्हणून शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की, 100 कामं सोडून आंघोळ करा आणि 1000 कामं सोडून भोजन करा.
ब्रह्म मुहूर्त – पहाटे 3.30 ते पहाटे 5.30 पर्यंत असतो.
शिव मुहूर्त – सकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत
हरी मुहूर्त – सकाळी 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत
दुपारच्या वेळी आंघोळ करणे टाळायला हवे, कारण जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.
पचनक्रियेवर परिणाम:
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास, पचनशक्ती कमी होते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही.
रक्तप्रवाहांवर परिणाम:
आंघोळ करताना शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे त्वचेकडे आणि स्नायूंकडे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे पचनसंस्थेकडे पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे अपचन आणि पोटात दुखण्याची समस्या येऊ शकते.
आयुर्वेदात काय सांगतं?
आयुर्वेद जेवणानंतर किमान ३० मिनिटे ते एक तास थांबून आंघोळ करण्याची शिफारस करतो.
सकाळची आंघोळ:
सकाळी आंघोळ करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे शरीर फ्रेश आणि उत्साही वाटते.
रात्रीची आंघोळ:
आयुर्वेदात रात्री आंघोळ करणं चुकीचं मानलं जातं, विशेषतः लांब आणि दाट केस असलेल्या लोकांसाठी, रात्री आंघोळ केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.
दुपारी आंघोळ:
कडक उन्हात दुपारी आंघोळ केल्याने अनेक आजारांचा धोका असतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)