Marathi News> हेल्थ
Advertisement

हॅन्ड सॅनिटायझरच्या अतिवापराचे आरोग्यावरील गंंभीर परिणाम

आरोग्य जपण्यासाठी स्वच्छता जपणंदेखील आवश्यक आहे. 

हॅन्ड सॅनिटायझरच्या अतिवापराचे आरोग्यावरील गंंभीर परिणाम

मुंबई : आरोग्य जपण्यासाठी स्वच्छता जपणंदेखील आवश्यक आहे. याकरिता अनेकजण जेवणापूर्वी, वॉशरूमचा वापर केल्यानंतर हॅन्ड सॅनिटायझरचा हमखास वापर करतात. मात्र कीटाणूंचा खात्मा करणारा उपाय अशी जाहिरात केली जात असली तरीही हॅन्डसॅनिटायझर अतिवापर आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. 

युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या एका प्रकाशित अहवालानुसार, अल्होहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर साध्या बॅक्टेरियांनादेखील सुपरबगमध्ये बदलतात. अशांचा खात्मा करण्यासाठी अनेक अ‍ॅन्टीबायिटिक्सदेखील परिणामकारक ठरत नसल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच अल्होहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझरचा अतिवापर करणं टाळा.  

कीटाणूंचा नाश करण्यासाठी पुरेसा नाही 

कीटाणूंना मारण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सॅनिटायझरमध्ये 60% अल्कोहल असते. हे कीटाणूंना मारण्यासाठी पुरेसे नाही. त्याऐवजी साबणच अधिक फायदेशीर आहे.  

सर्दी- खोकला  

तुम्ही सॅनिटायझरमध्ये अल्कोहल कमी असलेल्या पर्यायाची निवड करत असाल तर त्यामध्ये ट्राइक्लोसनचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. ट्राइक्लोसन हे पॉवरफूल अ‍ॅन्टीबॅक्टेरियल एजंट आहे. नियमित किंवा अतिवापरामुळे पारंपारिक अ‍ॅन्टिबायोटीक्सचा प्रभाव कमी होतो. यामुळे खोकला, सर्दीचा त्रास वाढतो. 

त्वचा शुष्क होते 

हॅन्ड सॅनिटायझरच्या सततच्या वापरामुळे त्वचा शुष्क होण्याची शक्यता असते. हॅन्डसॅनिटायझरच्या अतिवापरामुळे काही त्वचा रोगांचाही धोका बळावतो. त्यामुळे हॅन्ड सॅनिटायझरच्या वापरानंतर हॅन्ड लोशन लावण्याचाही सल्ला दिला जातो. 

फर्टिलिटीवर परिणाम 

सॅनिटायझरमध्ये फालेट्स घटक अधिक आढळतात. याचा आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने लोकांमध्ये फर्टिलिटीशी निगडीत समस्या वाढतात. 

सारेच बॅक्टेरिया नष्ट होतात 

सॅनिटायाझरमुळे केवळ घातकच नव्हे तर चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. यामुळे इम्युनिटीदेखील धोक्यात येते. परिणामी आजरपण वाढण्याची शक्यता बळावते. 

Read More