Marathi News> हेल्थ
Advertisement

दातावर उपचार करायला गेलेल्या 8 जणांच्या मृत्यूचं रहस्य 2 वर्षांनी उलगडलं; एका बाटलीने घेतला जीव

तामिळनाडूतील तिरुपत्तूरमध्ये एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या दातांच्या दवाखान्यात उपचार घेतलेल्या आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या एका चुकीमुळे त्यांना जीवाला मुकावे लागले.   

दातावर उपचार करायला गेलेल्या 8 जणांच्या मृत्यूचं रहस्य 2 वर्षांनी उलगडलं; एका बाटलीने घेतला जीव

Contaminated Saline Bottle: हॉस्पिटल असो किंवा क्लिनिक कर्चमारी किंवा डॉक्टरच्या एका चुकीमुळे मोठा संकटाला समोरे जावं लागू शकतं. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 2023 मध्ये तामिळनाडूतील वानियांबाडी इथे न्यूरोमेलिओइडोसिस, एक गंभीर जिवाणू मेंदू संसर्गाचा उद्रेक झाल्यामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला. दाताचा उपचार करायला गेलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधील एका चुकीमुळे जीवाला मुकाव लागल. सरकारी संस्थांनी नोंदवले नसलेले हे उद्रेक स्थानिक दंत चिकित्सालयातील निर्जंतुकीकरण न करण्याच्या पद्धतींशी थेट जोडलेले आहे. या घटनेनंतर सीएमसी वेल्लोर, आयसीएमआर-एनआयई आणि तामिळनाडू सार्वजनिक आरोग्य विभागानं संयुक्त चौकशी करण्यात आली. या समितीने दिलेला अहवाल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला होता पण तो सरकारी विभागानं जाहीर केला नाही. या अहवालानुसार जंतू संसर्गाशिवाय खराब उपकरणं आणि अस्वच्छतेमुळे या 8 जणांचा मृत्यू झाला होता. (tamil nadu vaniyambadi lancet neuromelioidosis 8 deaths  people who went for dental treatment saline bottle )

सलाईनच्या बाटलीला संसर्ग कसा झाला?

चौकशीदरम्यान असे आढळून आले की, सलाईनची बाटली उघडण्यासाठी निर्जंतुकीकरण न केलेले शस्त्रक्रिया उपकरण वापरले गेले होते, जे नंतर सैलपणे पुन्हा सील करून पुन्हा वापरले गेले. हे दूषित सलाईन द्रावण दंत प्रक्रियेदरम्यान वापरले गेले, ज्यामुळे किमान 10 रुग्णांना थेट संसर्ग झाला, ज्यामुळे मृत्यूदर 80% इतका वाढला. अहवालानुसार हॉस्पिटमध्ये पेरिओस्टियल एलिव्हेटर नावाच्या सर्जिकल टूलचा वापर सलाईनची बाटल उघडण्यात आली होती. त्यानंतर हीच बाटल वारंवरा रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात आली होती. 

मेंदूवर थेट परिणाम

संशोधकांचा असा विश्वास आहे की रक्तप्रवाहाला बायपास करून, रक्तवाहिन्यांमधून थेट मेंदूत जाणारे जीवाणू हे जलद आणि उच्च मृत्यूदराचे कारण होते. संपूर्ण जनुक क्रमवारीत मेंदूवर आक्रमक हल्ला करणाऱ्या जीवाणूंमध्ये एका जनुकाची उपस्थिती देखील दिसून आली.  लॅन्सेटमध्ये अभ्यास लेख लिहिणाऱ्या डॉ. एंजल मिराक्लिन थिरुग्नानाकुमार यांनी यामागील शास्त्रीय कारणं सांगितली. 'खराब सलाईन लावण्यात आल्यानं बॅक्टेरिया नसांमधून थेट डोक्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे संसर्ग वेगानं पसरला. हा बॅक्टेरिया थेट मेंदूवर हल्ला करणार होता,' अशी माहिती कुमार यांनी दिली.

न्यूरोमेलियोइडोसिस म्हणजे काय?

न्यूरोमेलियोइडोसिस एक गंभीर संसर्ग असून तो मेंदू आणि पाठीच्या कण्यावर त्याचा थेट परिणाम होतो. तो Burkholderia pseudomallei नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया घाणेरडं पाणी आणि मातीत सापडतो. उष्ण आणि दमट परिसरांमध्ये तो आढळून येतो.

Read More