Marathi News> हेल्थ
Advertisement

Hybrid Variant : कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटमुळे चौथ्या लाटेचा धोका? WHO अलर्टवर

कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. 

Hybrid Variant : कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटमुळे चौथ्या लाटेचा धोका? WHO अलर्टवर

मुंबई : कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक सध्य स्थितीतील व्हेरिएंटचा व्हायरस आहे. हा व्हेरिएंट लोकांना संक्रमित करण्याचा धोका आहे, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. ज्यांनी लस घेतली आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. अशा व्यक्तींना याची लागण होऊ शकते.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, या व्हेरिएंटचं बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे. अशा व्हेरिएंटमध्ये धोकादायक मानल्या जाणार्‍या डेल्टा आणि ओमिक्रॉनची अशा दोघांचीही लक्षणं आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल सारख्या देशांमध्ये कोविड रुग्णांमध्ये अशा व्हेरिएंटची प्रकरणं यापूर्वीच समोर आली आहेत. मात्र, अजूनपर्यंत भारतात याचं प्रकरण समोर आलेलं नाही.

इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेसचे डॉ. एस.के. सरीन म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांची जीनोम सिक्वेसिंग केली जातेय. आमच्या व्हायरोलॉजी लॅबमधील जीनोम सिक्वेन्सिंगच्या निकालांवरून असं दिसून आलंय की, सध्या संसर्ग होण्यास कारणीभूत असलेले सुमारे 98% व्हेरिएंट BA.2 आहेत. बाकीचे BA1 आहेत. हे दोन्ही प्रकार ओमायक्रॉनचे व्हेरिएंट आहेत.

तज्ज्ञांनी म्हटलंय की, यावेळी कोणताही बेजबाबदारपण करू नये. नवीन व्हेरिएंट वेळेवर शोधण्यासाठी त्याची माहिती घेत राहणं आवश्यक आहे. कारण यामुळे कोरोनाच्या व्हायरसची चौथी लाट येऊ शकते.

Read More