Marathi News> हेल्थ
Advertisement

Bad Cholesterol कमी करण्यासाठी 'या' 4 गोष्टी ठरतील फायदेशीर!

यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवतात. 

Bad Cholesterol कमी करण्यासाठी 'या' 4 गोष्टी ठरतील फायदेशीर!

मुंबई : कडधान्यं हा आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. डाळींमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवतात. फार कमी जणांना माहिती असेल, मात्र डाळींच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. 

ज्यांना आपल्या शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकायचं आहे त्यांच्यासाठी डाळींचं सेवन खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्‍यासाठी डाळी कशी उपयोगी ठरू शकतात हे पाहूया.

  • उडदाची डाळ शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. शिवाय यामुळे शरीराला लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी इत्यादी आवश्यक पोषक तत्त्वं पुरवतं. या डाळीच्या सेवनाने हाडंही मजबूत होतात.
  • जे लोक बॅड कोलेस्ट्रॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांनी हे लक्षात घ्या की, हिरवी मूग डाळ शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकते, शिवाय शरीराला आवश्यक पोषक तत्वे देते. याशिवाय हिरवी मूग डाळ खाल्ल्याने हृदय मजबूत बनवता येते.
  • मसूरच्या डाळीत प्रोटीन्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फोलेट, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे ती केवळ कोलेस्ट्रॉलच कमी करण्यास मदत होत नाही, तर रक्तातील साखर देखील नियंत्रित करण्यास मदत होते.
  • चणा डाळ आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. या डाळीच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येते. या डाळीत फायबर असते, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.
Read More