Marathi News> हेल्थ
Advertisement

Tapeworm : 'ही' भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

दररोज बाजारात मिळणाऱ्या भाजीमधून डोक्यात किडे प्रवेश करतात का? डॉक्टरांनी सांगितलं सत्य पावसाळ्यात काही विशिष्ट भाज्यांमध्ये किड सापडण्याची दाट शक्यता असते. ज्यामध्ये कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्यांचा समावेश असतो. या भाज्यांमधील किडे डोक्यात जातात का? याचा शरीरावर काय होतो परिणाम? 

Tapeworm : 'ही' भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Dangerous worm inside the cabbage: हिरव्या भाज्या किंवा काही फळभाज्यांमध्ये पावसाळ्यात खाल्ल्या जातात पण यामध्ये किड सहज सापडते. या वातावरणात कोबी चांगला येतो. त्यामुळे अनेक घरात कोबी खाल्ला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून कोबी खाल्ल्यावर त्यामधील किडे मेंदूत जात असल्याच सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे या भाजीमधील किडे शिजवल्यावरही मरत नाहीत. मेंदूत किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हटलं जातं. 

अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं, कोबीच्या भाजीला योग्य पद्धतीने शिजवलं नाही तर त्यामध्ये असलेले टेपवर्म म्हणजे किडे शरीरात शिरकाव करतात. हे किडे शरीरासाठी घातक असतात. असं म्हटलं जातं की, किडा खाण्यासोबत शरीरात शिरकाव करतो. पहिल्यांदा अन्नासोबत किडा पोटात जातो आणि मग तो आतड्यांमधून ब्लड फ्लोसोबत मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक लोक कोबी खाण्यापासून दूर राहतात. पण या गोष्टीमध्ये किती सत्य आहे याबाबत कुठेच खुलासा झालेला नाही. यावर पहिल्यांदाच डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. खरंच कोबीमध्ये किडे असतात का? हे किडे जीवघेणे असतात का? काय आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया. 

टेपवर्म म्हणजे काय? 

टेपवर्म एक चपटा आणि परजीवी किडा आहे. सामान्यपणे हा किडा वेगवेगळ्या जनांवरांमध्ये संक्रमित होतो. हा किडा त्यांच्या आतड्यांमध्ये मिळतो. हा किडा प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्ये देखील आढळतो. हे किडे आतड्यांमध्ये राहतात आणि शरीरातील पोषकतत्व खातात यामुळे त्या व्यक्तीला उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणे जाणवतात. 

मेंदूत किडे आहेत कसे ओळखाल? 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतड्यांमध्ये शिरल्यावर शरीरात विशेष बदल पाहायला मिळतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये देखील दिसतात. अशावेळी पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उल्टी, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

काय कराल? 

डॉक्टरांनी सांगितले की कोबी किंवा जंत असलेली कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवावी. जर असे केले नाही तर या अळ्या तुमच्या आतड्यांमध्ये जाऊ शकतात आणि तेथून तुमच्या मेंदूत जाऊ शकतात, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि झटके येऊ शकतात. याशिवाय भाज्या पूर्णपणे शिजवल्यानंतर खा.

भाज्यांमधील किडे रोखण्याचे मार्ग

कोबीतील जंत दूर ठेवण्यासाठी, त्यांच्यासोबत थाइम, सेज आणि पुदिना सारखी झाडे लावा. त्यांचा तीव्र वास कोबीच्या फुलपाखरे आणि त्यांच्या अळ्या दूर करू शकतो. कोबी शेतात हलक्या श्वास घेण्यायोग्य आवरणाने झाकून ठेवा. कडुलिंबाचे तेल एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, जे कोबीच्या जंतांना दूर करू शकते. मिरची आणि लसूण वापरून घरगुती स्प्रे बनवा, जे दोन्ही नैसर्गिक कीटकनाशके आहेत. कोबीच्या झाडांभोवती कुस्करलेल्या अंड्याचे कवच पसरवा. तीक्ष्ण कडा रांगणाऱ्या कीटकांना परावृत्त करतात.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

 

Read More