Marathi News> हेल्थ
Advertisement

गरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा

समुद्री पदार्थ  खाल्याने गर्भधारणेसाठी लागणारा कालावधी कमी लागतो

गरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा

नवी दिल्ली : गरदोरपणामध्ये काय काय खाऊ नये ? असे सल्ले देणारे अनेक जण भेटतात. त्यामुळे नेमकं काय खाव याबद्दल संभ्रम असतोच. रोज खाण्यात समुद्री पदार्थ असणारे आपल्या सेक्शुअल आयुष्यात अधिक सक्रिय असल्याचे एका रिसर्चमधून दिसून आलय. 'जर्नल ऑफ क्लिनकल एंडोक्राइनोलॉजी अॅण्ड मेटाबॉल्जिम'मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानुसार, या शोधात सहभागी झालेल्या ९२ टक्के जोडप्यातील महिलांना या तुलनेत कमी समुद्री पदार्थ खाणाऱ्या ७९ टक्के जोडप्यातील महिलांपेक्षा वर्ष संपेपर्यंत लवकर गर्भधारणा झाली.

लवकर गर्भधारणा 

समुद्री पदार्थ  खाल्याने गर्भधारणेसाठी लागणारा कालावधी कमी लागतो तसेच सेक्शुअली अधिक सक्रिय राहून प्रजननासंबधी फायदे होतात असे आमच्या संशोधनातून समोर आल्याचे बॉस्टनमधील हार्वार्ड टी.एच.चान स्कून ऑफ पब्लिक हेल्थ संशोधनमधील सहलेखक औड्रे गैस्किंस यांनी सांगितले. बाळ जन्मास घालण्याच्या विचारात असलेल्या जोडप्यांनी आठवड्यातून दोनदा समुद्री पदार्थ खालल्यास ते सेक्शुअली सक्रीय राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read More