Marathi News> हेल्थ
Advertisement

कोरड्या केसांना शॅम्पू करताना ही काळजी घ्या!

 रेशमी, चमकदार केस हवे असतील तर केसांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे

कोरड्या केसांना शॅम्पू करताना ही काळजी घ्या!

मुंबई : तुम्हाला जर रेशमी, चमकदार केस हवे असतील तर केसांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही केस कसे धुता आणि सुकवता यावर केसांचे आरोग्य अवलंबून असते. केस जर कोरडे आणि डॅमेज असतील तर केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरड्या, निस्तेज केसांमुळे त्रासले असाल तर या टिप्स नक्की आजमावून पहा...

#1. हलका रंग असलेला आणि प्रोटिनचे प्रमाण अधिक असलेल्या शॅम्पूची निवड करा.

#2. केसांना एकापेक्षा अधिक वेळा शॅम्पू लावू नका. जर दोनदा शॅम्पू करत असला तर  शॅम्पू अधिक वेळ केसांवर ठेवू नका. लगेच पाण्याने केस धुवा.

#3. हेअर क्रिम, हेअर कंडीशनर आणि हेअर मास्कचा आर्वजून वापर करा.

#4. शॅम्पू घेताना त्यात आर्गेन तेल आणि खोबरेल तेल असल्याची अवश्य खात्री करा. 

Read More