Marathi News> हेल्थ
Advertisement

हिवाळ्यात जॉगिंंग करताना 'ही' काळजी नक्की घ्या

हिवाळ्याच्या दिवसात सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडण्याची सवय टिकवून ठेवणं हे फारच आव्हानात्मक आहे. यासाठी बरीच इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते. पण हिवाळ्यात जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.  

हिवाळ्यात जॉगिंंग करताना 'ही' काळजी नक्की घ्या

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडण्याची सवय टिकवून ठेवणं हे फारच आव्हानात्मक आहे. यासाठी बरीच इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते. पण हिवाळ्यात जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.  

हिवाळ्याला साजेसे कपडे - 

हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीपासऊन बचाव करण्यासाठी ग्लोव्ह्ज, सॉक्स, कॅप यांची खरेदी करा. तसेच महिलांनी स्पोर्ट्स ब्रा, टंक टॉप, लॉन्ग स्लिव्ह्सचे लेअर जॅकेट यांची खरेदी करा. यामुळे हिवाळ्याच्या दिवसात जॉंगिगचा व्यायाम करताना त्रास होणार नाही.यामुळे शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते.  

हिवाळ्याच्या दिवसात सकाळ- संध्याकाळ वातावरणात थंडावा असतो. अशावेळेस थंडीपासून बचाव करणारे पुरेसे कपडे घालावेत. लॉन्ग कोट घालणार असाल तर आतमध्ये पातळ कपडे घाला. अन्यथा धावताना घामामुळे त्रास होण्याची शक्यता असते. तुम्हांला आवश्यक वाटेल इतकेच कपडे घालून बाहेर पडा.  

वॉटर प्रुफ स्निकर  - 

घसरड्या वाटेवरून जाताना सॅन्डल किंवा शूज घालून चालताना काळजी घ्या. वॉटर प्रुफ स्निकरची निवड करा. काही वेळेस पायाला घाम आल्यास पाय सरकण्याची शक्यता असते. अशावेळेस वॉटरप्रुफ स्निकर्स फायदेशीर ठरतील.  

हिवाळ्याच्या दिवसात धावताना तुम्ही कोणत्या रस्स्त्यावरून धावताय हे पाहणंदेखील गरजेचे आहे. कारण रस्त्यावर पडल्यास ढोपर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पेव्हर ब्लॉकवरून धावण्याऐवजी मैदानात व्यायाम करा  

Read More