Marathi News> हेल्थ
Advertisement

Viral Polkhol : मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय, होऊ शकतो 'हा' गंभीर आजार?

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये आणखी एका उपकरणाचा समावेश झाला आहे आणि तो म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. गेल्या काही काळात मायक्रोवेव्हचा वापर वाढला आहे. आता तर सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातही मायक्रोवेव्ह दिसून लागले आहेत.

Viral Polkhol : मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय, होऊ शकतो 'हा' गंभीर आजार?

Viral Polkhol : घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या सध्याच्या काळात सर्वच झटपट लागतं. यात अगदी फास्ट फूड (Fast Food) असो की झटपट जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave Oven) असोत. पण सध्या एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत असल्याने लोकांची धास्ती वाढलीय. मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करून खाल्ल्याने कॅन्सर (Cancer) होतो असा दावा व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का?. याची सगळ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचणं गरजेचं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज
मायक्रोवेव्हमधून जेवण गरम करताना रेडिएशन (Radiation) निघत असतं. त्यामुळे जेवण रेडिओअॅक्टिव्ह (Radioactive) होतं. असं जेवण खाल्ल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा धक्कादायक आहे. ऑफिस, हॉटेल, घरी जेवण पुन्हा गरम करण्यासाठी अनेकजण मायक्रोव्हेव वापरतात. त्यामुळे या दाव्याची पोलखोल करण्यासाठी आमची व्हायरल पोलखोल (Viral Polkhol) टीम तज्ज्ञांना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि या व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घेतलं.

व्हायरल पोलखोल 
मायक्रोवेव्हमधलं गरम जेवण खाल्ल्याने कॅन्सरचा धोका नाही 

fallbacks
मायक्रोवेव्हमधून धोकादायक रेडिएशन येत नाही

fallbacks
मायक्रोवेव्ह हा केवळ जेवण गरम करण्याचं काम करतो

fallbacks

असं असलं तरी मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताना काळजी घ्यायला हवी. काचेच्या भांड्यातून जेवण गरम करायला हवं. प्लास्टिकचं भांडं जेवण गरम करण्यासाठी वापरू नका. त्यावेळी प्लास्टिकचे कण पोटात जाऊन गंभीर आजार होऊ शकतो.  मायक्रोवेव्हमधील उष्णतेमुळे प्लास्टिकमधील विषारी अशा पॉलीमर कणांना सुटं करते. सुटं झाल्यानंतर हे पॉलिमर कण अन्नात मिसळतात. या पॉलिमरमुळे शरीरातील हार्मोन्सचं विघटन होऊ लागतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मायक्रोवेव्हमध्ये कधीच करून नये. मात्र, मायक्रोवेव्हमधून जेवण खाल्ल्याने कॅन्सर होतो हा दावा असत्य ठरला.

Read More