Marathi News> हेल्थ
Advertisement

Walk Tips: चालून आल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? आजच सुधारा

जाणून घेऊया चालल्यानंतर आणखी कोणत्या चुका होतात, ज्या दुरुस्त करता येऊ शकतात.

Walk Tips: चालून आल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? आजच सुधारा

मुंबई : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पायी चालणं खूप महत्वाचं आहे. परंतु चालल्यानंतर अनेक वेळा काही लोक अशा चुका करतात, ज्यामुळे चालण्याचे फायदे होण्याऐवजी नुकसान होतं. याचं कारण म्हणजे, व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर काही गोष्टी सहन करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया चालल्यानंतर आणखी कोणत्या चुका होतात, ज्या दुरुस्त करता येऊ शकतात.

चालल्यानंतर खाऊ नका

काही लोकं असे असतात ज्यांना चालल्यानंतर भूक लागते आणि अशावेळी ते तातडीने खातात. मात्र असं केल्याने फायद्याऐवजी जास्त नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चालल्यानंतर किमान 20-30 मिनिटांनी खाणं खाल्लं पाहिजे.

चालल्यानंतर तातडीने झोपू नका

काही लोक चालल्यानंतर इतकं थकतात की त्यांना तातडीने झोप येते. अशावेळी ते खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत चालल्यानंतर काही वेळाने झोपलं पाहिजे. मुळात, चालल्यानंतर हृदयाचे ठोके जलद होतात, त्यामुळे झोप लगेच टाळली पाहिजे.

घामाचे कपडे लगेच बदला

रनिंग किंवा वॉकिंग केल्यानंतर खूप घाम येतो. अशावेळी काहीजणं कंटाळा करून कपडे न बदलता तसंच दैनंदिन काम सुरु ठेवतात. मात्र असं केल्याने त्वचेला एलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालून आल्यानंतर कपडे बदलायला विसरू नका.

Read More